शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

अनलॉकनंतर पालेभाज्या ३० टक्क्यांनी महागल्या, शेवगा, वांगी, कारले शंभरीपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : मागील दोन महिने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. तसेच भाजीपाल्याची विक्रीही सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. आता अनलॉकनंतर ...

उस्मानाबाद : मागील दोन महिने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. तसेच भाजीपाल्याची विक्रीही सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. आता अनलॉकनंतर बाजारपेठ पूर्वपदावर येत असून, भाजी मंडईतही व्यापारी व शेतकरी भाज्या विक्रीस घेऊन येत आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीमुळे शेतकरी खरिपातील पिके घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचा तुडवडा निर्माण झाला आहे. परिणामी, भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला आहे. तर पालेभाज्यांच्या किमती दुपटीने वाढल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी फळ मार्केट व भाजी मंडई दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, चुका, पालक या भाज्यांच्या जुड्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. शिवाय, शेवग्याचाही तुटवडा निर्माण झाल्याने शेवगा १२० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. वांगी, कारले प्रत्येकी १०० रुपये किलोने विक्री होत आहेत. तर टोमॅटो, लसूण, कांद्याचे दर स्थिर आहेत.

भाजीपाल्याचे दर

भाजीपाला १ जून २१ जून

दोडका ८० ७०

कारले १०० ८०

टोमॅटो २५ २५

वांगी १०० १००

भेंडी ८० ७०

गवार ८० ६०

भेंडी ६० ६०

हिरवी मिरची ६० ६०

शिमला मिरची ८० ६०

फ्लॉवर ८० ६०

मेथी २५ १५

पालक २० १०

शेपू २० १०

चुका २० १०

पुन्हा वरणावर जोर

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या अनलाॅकनंतर बाजारपेठ सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र, पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा वरणावर भर दिला आहे.

- प्रतिभा हावळे, गृहिणी

लॉकडाऊन काळात फळभाज्या व पालेभाज्या हातगाड्यांवर सहज मिळत होत्या. त्यावेळी भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते. अनलॉकनंतर मेथी, शेपू, चुका, पालक पालेभाज्या महागल्या आहेत. त्यामुळे फळभाज्यांची खरेदी करावी लागत आहे.

- महानंदा भोसले, गृहिणी

शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

शेतात अर्धा एकर कारल्याची लागवड केली होती. त्यासाठी ४० हजार रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे बाजार बंद होते. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहनांचा खर्च वाढला आहे. अर्धा एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुरळीत बाजार असता तर एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले असते.

- दत्ता माळी, शेतकरी, काजळा

अर्धा एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी २० हजार रुपये खर्च झाला. मात्र लाॅकडाऊनमुळे बाजार बंद असल्यामुळे मिरची मोडून सोयाबीन लावले आहे. मिरची लागवडीत २० हजार रुपयांचे नुकसान झाले.

- नामदेव घोडके, शेतकरी, बरमगाव बु.