शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाटशिरपुऱ्यातील बाधित कुटुंबाने शेतात हलविला मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

कळंब : कोरोनाचा आकडा चिंता वाढवत असताना अनेकजण बेफिकिरीने वावरत आहेत. एकूणच ‘कळतंय पण, वळत नाही’ अशी अवस्था असणाऱ्यांची ...

कळंब : कोरोनाचा आकडा चिंता वाढवत असताना अनेकजण बेफिकिरीने वावरत आहेत. एकूणच ‘कळतंय पण, वळत नाही’ अशी अवस्था असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे भाटशिरपुरा येथील एका बाधित कुटुंबाने मात्र लोकांना आपला ‘ताप’ नको म्हणत थेट शेतात राहुटी ठोकत ‘आयसोलेट’ करून घेतले आहे.

‘आपल्याला बऱ्यापैकी कळतंय' असा समज असलेली उच्चशिक्षित मंडळीही कोरोना प्रादुर्भाव काळात बेफिकीर वागत आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क, टेस्टिंग, ट्रेसिंग याबाबतीत तर सजगपणा दिसून येतच नाही, शिवाय स्वॅब दिल्यानंतर त्याचा निकाल येण्याआधी बाहेर हुंदडणाऱ्यांची, बाधितांचा सहवास असताना समाजात मिसळणारी माणसे दिसून येत आहेत.

सुन्न करणाऱ्या वातावरणात असे बेफिकीर राहणाऱ्यांचा वावर दिसून येत असला तरी काही डोळस, समाजभान असलेली माणसंही समोर येतात. आपणासारखे इतरावर संकट कोसळू नये, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, अशी काळजी घेणाऱ्या या मंडळीची संख्या मात्र तशी तोकडीच.

तालुक्यातील भाटशिरपुरा येथील एका साठी पार केलेल्या सदगृहस्थांचे कुटुंब यापैकीच एक आजी, आजोबा, मुलगा, सून व दोन नातवंडे असे सहा व्यक्तींचे त्यांचे कुटुंब. चार दिवसांपूर्वी या कुटुंबाला कोरोनाचा स्पर्श झाला अन् चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दोनेक हजार लोकसंख्या व साडेतीनशे उंबरठा असलेल्या भाटशिरपुरा गावातील मुख्य चौकात त्यांचे घर. वर्दळीच्या भागात असलेल्या आपल्या घरात त्यांनी ‘होम आयसोलेट’ व्हायचं ठरवलं होतं. मात्र, आपल्यामुळे लोकांना त्रास नको म्हणून या कुटुंबाने स्वतःच्या शेतात राहून उपचार घ्यायचे ठरवले.

शेतात पक्का निवारा नसल्याने ज्वारीचा कडबा वापरत पारंपरिक पद्धतीची ‘कोप’ उभारण्यात आली. या निवाऱ्यातच ६० वर्षांचे आजोबा, ५५ वर्षांच्या आजी, ४० वर्षांचा मुलगा, सून व दोन नातवंडे सध्या ‘आयसोलेट’ होत डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत.

चौकट...

केवळ इतरांना त्रास होऊ नये यासाठी...

भाटशिरपुरा येथील ‘फार्म आयसोलेशन’ झालेल्या कुटुंबाने उस्मानाबाद येथे जाऊन आपल्या आवश्यक त्या तपासण्या केल्या आहेत. सध्या ते शेतात उपचार घेत आहेत. केवळ इतरांना आपल्यापासून त्रास होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. उपसरपंच मेजर सूर्यकांत खापे व त्यांच्या मित्रांनी स्वतः या राहुटीवर पोहोचत सर्वांची ऑक्सिजन पातळी तपासली आहे.