शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंनी दिले पाच व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद व कळंबसाठी पाच व्हेंटिलेटर नुकतेच देऊ केले आहेत. ते जिल्ह्यात दाखल ...

उस्मानाबाद : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद व कळंबसाठी पाच व्हेंटिलेटर नुकतेच देऊ केले आहेत. ते जिल्ह्यात दाखल झाले असून, यातील दोन कळंब उपजिल्हा रुग्णालयास तर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयास तीन व्हेंटिलेटर खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हे उच्च दर्जाचे व्हेंटिलेटर असल्याने रुग्णांना त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. व्हेंटिलेटरचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कमी पडू नये, यासाठी सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहेच. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लँट सुरु झाले असून, साखर कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यात देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रयोग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सरकारच्या पुढाकाराने यशस्वी झाल्याचे आमदार पाटील म्हणाले. दरम्यान, उस्मानाबाद व कळंब येथील शासकीय रुग्णालयामध्ये व्हेंटीलेटरची आवश्यकता अधिक भासत होती. बाधित रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सेवा व उपचार मिळावे, या दृष्टिकोनातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने पाच व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयासाठी तीन व कळंब उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन व्हेंटिलेटर मिळाले असून, शिवसेनेकडून आलेले हे व्हेंटिलेटर अत्याधुनिक व नामांकित आहेत. उच्च तंत्रज्ञानाने युक्त व हाताळण्यास अत्यंत सुलभ असलेल्या या आधुनिक व्हेंटिलेटरचा मोठा फायदा दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयास शुक्रवारी तर शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे हे व्हेंटिलेटर सुपुर्द करण्यात आल्याचे आ. कैलास पाटील यांनी सांगितले. यावेळी यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंबचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख, डॉ.ईस्माईल मुल्ला उपस्थित होते.