उस्मानाबाद : तलावातील विद्युत पंपाच्या चोरी प्रकरणात येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने वरूडा पारधी पेढी येथून एकास चोरीच्या केबलसह ताब्यात घेतले. ही कारवाई ७ जून रोजी करण्यात आली. येथील स्वप्निल रवींद्र कचरे यांच्या वाघोली येथील तलावातून जलसिंचन विद्युत पंपाची ९१ मीटर केबल २२ व २३ मे दरम्यान चोरीस गेली होती. याप्रकरणी कचरे यांच्या फिर्यादीवरून येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल टोंगळे, सपोफौ किशोर रोकडे, पोना समाधान वाघमारे, माने यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करून व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वरूडा पारधी पेढी येथे छापा टाकला. या ठिकाणाहून दादा लक्ष्मण पवार ऊर्फ चिलम्या (वय २६) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीची केबल जप्त केली आहे.
चोरीच्या केबलसह आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST