भूम -खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. तर दुसरीकडे कृषी यंत्रणेकडूनही जाेरदार तयारी करण्यात आली आहे. यंदा सुमारे ६० हजार ७४१ हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही साेयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढेल, असा अंदाज असल्याने ७ हजार ९९८ क्विंटल बियाणाची मागणी केली आहे.
भूम तालुक्यात दरवर्षी पाडवा सणानंतर पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरवात होते. बैल जोडी खरेदी-विक्री याच काळात आसते. यंदा लाॅकडाऊनमुळे जनावाराचे आठवडी बाजार बंद आसल्याने मोगडा, नांगरणी, तन वेचणी, पाळी मारुन खरिपासाठी रान तयार करण्यासाठी बैल जोडीची कमतरता भासली. यातून मार्ग काढत बहुतांश शेतकर्यांनी ट्रॅक्टरद्वारे पेरणीपूर्व मशागतीची कामे हाती घेतली. असे असतानाच दुसरीकडे खत, बियाणाचा तुटवडा निर्माण हाेऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. यंदा ६० हजार ७४१ हेक्टर क्षेत्र खरपी पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. इतर पिकांच्या तुलनेत साेयाबीनचा अधिक क्षेत्रावर पेरणी हाेते. ही बाब लक्षात घेऊन सुमारे २७ हजार ८१८ हेक्टर क्षेत्र केले. यासाठी ७ हजार ९९८ क्विंटल बियाणे मागणी केले आहे. सध्या ६२४ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणेही दाखल हाेत असल्याचे ‘कृषी’कडून सांगण्यात आले.
चाैकट...
कृषी विभागाकडून रासायनिक खतांचीही माेठ्या प्रमाणात मागणी केली आहे. यामध्ये युरिया २०१६ मे. टन , डीएपी २११२ मेट्रीक टन, एनपीके ३९८४ मेट्रीक टन, एसएसपी ३३६ मेट्रीक टन, एमओबी ४८० मेट्रीक टन असे एकूण ८ हजार ९२८ मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी केली आहे .