शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ...

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी आहे, तर ५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

वर्षा-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा पिकांचे नुकसान झाले, तर पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर शेतकरी पिके घेत असतात. शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता भासत असते. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी रक्कम मिळावी, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास प्रारंभ झाला. कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना शहरातील बँकामध्ये येता येत नव्हते. त्यामुळे कर्ज वितरणाची गती मंदावलेली होती. जून महिन्यापासून निर्बंध शिथिल झाले, तसेच जून महिन्यात पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. जून-जुलै, ऑगस्ट महिन्यातही कर्ज वाटपास म्हणावी तशी गती आलेली दिसत नाही. १५ ऑगस्ट अखेरपर्यंत ४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी असून, अद्याप ६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज वाटपात आघाडीवर

जिल्ह्यास खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस २६९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १९ हजार ३९२ शेतकऱ्यांना १६७ कोटी ७ लाख रुपये कर्ज वितरित केले आहे. त्याची टक्केवारी ६२ इतकी आहे. त्या खालोखाल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने ४६ हजार २३३ शेतकऱ्यांना १८४ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वाटत केले. त्याची टक्केवारी ५६ इतकी आहे.

खरीप हंगाम संपत आला असून, मूग, उडीद पीक काढणीस आले आहेत. सोयाबीन पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या शेतकऱ्यांना मळणी, मजुरासाठी पैशाची आवश्यकता भासत आहे. मात्र, अशा स्थितीत पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.