शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

कारमध्ये पकडला पावणेतीन लाखांचा गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST

येडशी (जि. उस्मानाबाद) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गानजीक लातूर-पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री ग्रामीण पोलिसांनी एका कारची झडती घेतली. तेव्हा ...

येडशी (जि. उस्मानाबाद) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गानजीक लातूर-पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री ग्रामीण पोलिसांनी एका कारची झडती घेतली. तेव्हा त्यात २८ किलोग्रॅम गांजा आढळून आला. कार व गांजा जप्त करून पोलिसांनी तीन आरोपींना गजाआड केले आहे. लातूर-पुणे मार्गावरून एका महागड्या कारमधून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक योगेश शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री येडशी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. तेव्हा एक महागडी कार (क्र. एम.एच.०३ बीडब्यू ९०५६) ही संशयास्पदरीत्या येथील एका हॉटेलजवळ थांबल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लागलीच या कारची झडती घेतली. तेव्हा आत २८ किलो गांजा बेकायदेशीररीत्या ठेवून त्याची तस्करी सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा २ लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा, कारसह रोख रक्कम, तीन मोबाईल असा ७ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी पिंटू अंबादास शिंदे (वय ३४), रामा अर्जुन शिंदे (२३), स्वाती संजय शिंदे (२७) सर्व रा. मांडवा जि. उस्मानाबाद या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांना पाहताच चौथा आरोपी राजू कालिदास काळे हा घटना स्थळावरून पसार झाला. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक निरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत.