------------
जुन्या भांडणावरून दगड, काठीने मारहाण
डाेकेवाडी येथील घटना : चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल
उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून चाैघांनी मिळून पाचजणांना दगड, काठीने बेदम मारहाण केली. ही घटना ४ जुलै राेजी वाशी तालुक्यातील डाेकेवाडी येथे घडली. याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, डाेकेवाडी येथील रेशमा निखिल भाेसले यांच्यासह पती निखिल, सासरे तात्या, सासू रेणुका व मुलगी दीक्षा यांना ४ जुलै राेजी ८ वाजेच्या सुमारास जामखेड येथील नातेवाईक विक्या भाेसले, नागेश भाेसले, अनुल ऊर्फ भय्या भाेसले, भाेलड्या काळे यांनी मागील भांडणाचा राग धरून रेशमा भाेसले यांच्या कुटुंबीयांस शिवीगाळ केली. यानंतर दगड व काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी रेश्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जुलै राेजी वाशी पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.