शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२०४ लाभार्थ्यांना मिळणार कृत्रिम अवयव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:12 IST

सास्तूर येथे दोन दिवसीय तपासणी शिबिर लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत दिव्यांगांना सहायक साधने व कृत्रिम ...

सास्तूर येथे दोन दिवसीय तपासणी शिबिर

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत दिव्यांगांना सहायक साधने व कृत्रिम उपकरणे मोफत वाटपासाठी दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २०४ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून, कृत्रिम पाय, कॅलिपर्स, क्रेचससाठी मोजमाप घेण्यात आले. तसेच व्हीलचेअर, तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र, ब्रेल काठी, एम. आर. किटसाठी दिव्यांग व्यक्तींची निवड करण्यात आली.

सीएसआर योजनेंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व निवासी दिव्यांग शाळा (सास्तूर) यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्‌घाटन भारत कांबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बालाजी शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश यादव, गौरीश साळुंके, वंचित बहुजन आघाडीचे लोहारा तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे, शिबिराचे समन्वयक बी. टी. नादरगे, भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रा. बी. एम. बालवाड, शौकतअली मासुलदार, महंमद अत्तार, भाऊसाहेब आंबेकर उपस्थित होते. सर्व पात्र लाभार्थ्यांना मार्च-२०२१ मध्ये मोफत साहित्य वितरित करण्यात येणार असल्याचे आयोजक कमलेश यादव यांनी सांगितले.

शिबिरासाठी आर. डी. बेंबडे, आर. ई. इरलापल्ले, बालाजी गुणाले, आर. पी. गुंडुरे, अंजली चलवाड, सुरेखा परीट, ज्ञानोबा माने, गोरख पालमपल्ले, शंकरबावा गिरी, निशांत सावंत, निवृत्ती सूर्यवंशी, दगडू सगर, सूर्यकांत कोरे, भीमराव गिर्दवाड, सुनीता कज्जेवाड, किरण मैंदर्गे, प्रयागताई पवळे आदींनी पुढाकार घेतला.