शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

१८९ अंगणवाड्या झाल्या थेट नळयोजनेशी कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

कळंब : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यातील ‘निर्जळी’ आता दूर होणार असून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून या अंगणवाड्यांना नळजोडणी ...

कळंब : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यातील ‘निर्जळी’ आता दूर होणार असून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून या अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यासाठी ‘मिशनमोड’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे तालुक्यातील १८९ अंगणवाड्या थेट नळयोजनेशी ‘कनेक्ट’ झाल्या आहेत.

महिला व बालकल्याण विकास विभागाच्यावतीने शून्य ते सहा वयोगटातील बालकं, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात शिक्षण ते आरोग्यवर्धन, मार्गदर्शन ते सुपोषण यावर भर दिला जातो. यासाठी अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून, त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. बालक, माता, मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळ्या जागेत, विरळ वस्ती भागासह वाडी अन् वस्तीवर आहेत. यामुळेच तेथे बहुधा पिण्याच्या किंवा सांडपाण्याची सोय उपलब्ध नसते.

यामुळे याठिकाणी पोषण आहार घेतला तर पाणी प्यायचे कुठले, असा प्रश्न पडत असे. यास्थितीत केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीत पाण्याची सोय करण्याचा महत्वाचा असा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता याच्या प्रगतीवर दररोज विशेष लक्ष ठेवून आहेत.

चौकट...

निर्जळी झाली दूर

तालुक्यात एकूण १८९ अंगणवाड्या आहेत. यापैकी बहुतांश अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय नव्हती. नळयोजनेशी जोडले न गेल्याने पाण्याची कायम ‘निर्जळी’ असे. यामुळे एकात्मिक बालविकास विभागाने जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय होईल, यावर विशेष भर दिला. यासंबंधी ग्रामपंचायत व सर्व शिक्षा अभियान यांच्याकडे आपली गरज नोंदवली. आजच्या स्थितीत यापैकी १८९ अंगणवाड्या नळयोजनेशी कनेक्ट झाल्या आहेत, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनी सांगितले.

हजारो बालकांना होणार फायदा...

तालुक्यातील २४९ पैकी १८९ अंगणवाड्यात पाण्याची सोय करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला आहे. तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील एकूण १५ हजार बालके अंगणवाडीच्या पटावर आहेत. यातील बहुतांश बालकांना आता पाणी उपलब्ध होणार आहे. नाईकनगर, महादेवनगर, गायरानवस्ती, काळदाते वस्ती अशा अनेक वस्तींना नळ जोडणी दिली आहे. यासाठी काहींना पोषण अभियानातून तर काहींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आधार मिळाला आहे.