शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात भरणार १७ हजार रिक्त पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

उस्मानाबाद : राज्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी १७ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ८५०० ...

उस्मानाबाद : राज्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी १७ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ८५०० पदांची जाहिरात उद्याच येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कळंब येथे दिली.

राजेश टोपे हे रविवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. आरोग्य यंत्रणाही यानिमित्ताने बळकट करता आली. मात्र, अजूनही मनुष्यबळाची निकड या विभागास असल्याचे लक्षात आले. ही गरज पाहून आरोग्य विभागात १७ हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यातील क व ड दर्जाची पदे आधी भरली जाणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही पदे भरतानाच उर्वरित पदे ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून लवकरच भरली जातील. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ८५०० पदांची जाहिरात उद्याच येत असल्याचेही राजेश टोपे म्हणाले.

चौकट.........

शहरांच्या नामांतराच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, आमच्यासाठी हा विषय महत्वाचा नाही. आमचे प्राधान्य विकासकामांना आहे. नंतर बाकीच्या गोष्टी. जर असा काही निर्णय घ्यायचाच असेल तर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून याविषयी ठरवतील.