शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा पाठलाग करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:36 IST

अश्लील फोटो व्हायरल, सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : विवाह नोंदणी संकेतस्थळावरून रेडिओ जॉकी तरुणीची माहिती मिळवत, पुढे लग्नासाठी तिच्यामागे तगादा लावला. तरुणीने नकार देताच तिचा पाठलाग करून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या आरोपीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विजय अलेक्झांडर असे आरोपीचे नाव आहे. तो मध्य प्रदेशमध्ये चालक म्हणून काम करतो. ६ नोव्हेंबर रोजी रेडीओ जॉकी तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार, विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ती विजयच्या संपर्कात आली. विजयने तिचा विश्वास संपादन केला. पुढे तिच्या बँकेचा तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तरुणीला संशय आला. तिने त्याच्याशी बोलणे टाळले. त्याचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केला. त्यानंतर विजयने अन्य अ‍ॅपवरून संदेश धाडण्यास सुरुवात केली. तसेच तरुणीच्या सोशल मीडियावरील फोटोंना मॉर्फ करून ते प्रसारित करण्याची धमकीही तो देऊ लागला. तसेच तरुणीचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर प्रसारित केल्याने तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

तपासात आंध्र प्रदेश कनेक्शन समोर येताच तपास पथक आंध्र प्रदेशच्या विजयवाडा परिसरात रवाना झाले. तेथून त्यांनी विजयला ताब्यात घेतले. विजय हा विवाह नोंदणी संकेतस्थळावरून महिलांशी ओळख करत असे. पुढे याच ओळखीतून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना जाळ्यात ओढायचा. पुढे त्यांचे फोटो मिळवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळत असल्याचे तपासात समोर आले आहे.

स्वत:ची माहिती गोपनीय ठेवा...अशा प्रकारच्या फसवणुकीला थांबविण्यासाठी महिलांनी सोशल मीडियावर स्वत:ची माहिती गोपनीय ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच बँक खात्यांचा तपशीलही कुणाला शेअर करू नये, असेही त्यांच्याकडून नमूद करण्यात आले.