शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जहाल महिला नक्षलवादी पार्वती सडमेक हिला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:39 IST

२४ गुन्ह्यातील आरोपी : सहा लाखांचे होते बक्षीस

ठळक मुद्दे ती नक्षल चळवळीत भामरागड एरिया कमिटी मेंबर या पदावर कार्यरत होती.विविध पोलीस ठाण्यात तिच्यावर २४ गंभीर गुन्हे दाखल असून याशिवाय तिचा आणखी किती गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.

गडचिरोली - विविध प्रकारच्या २४ गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली जहाल महिला नक्षलवादी पार्वती उर्फ सुशिला शंकर सडमेक (२४ वर्ष) हिला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले. ती नक्षल चळवळीत भामरागड एरिया कमिटी मेंबर या पदावर कार्यरत होती. तिच्यावर शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

शुक्रवार दि.६ रोजी तिला भामरागड तालुक्यातील नैनवाडी येथील डुंडा कोमटी मडावी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शनिवारी (दि.७) न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पार्वती सडमेक हिच्या अटकेसाठी शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तिच्यावर २४ गंभीर गुन्हे दाखल असून याशिवाय तिचा आणखी किती गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.याचा तपास पोलीस करत आहेत.अवघ्या ११ वर्षाच्या वयात झाली नक्षलवादी२००६ मध्ये म्हणजे अवघ्या ११ वर्षाच्या वयात पार्वती नक्षल दलममध्ये भरती झाली होती. २००८ पर्यंत ती दलम सदस्य पदावर तर २००८ ते २०१० या कालावधीत जहाल नक्षली नेता नर्मदा हिची अंगरक्षक म्हणून काम पाहात होती. २०१० ते २०१२ यादरम्यान ती गट्टा (जां) दलममध्ये दलम कमांडर रामको याच्यासोबत महिला संघटनेचे काम पाहात होती. २०१२ ते २०१४ या कालावधीत भामरागड दलम उपकमांडर पदावर काम पाहिल्यानंतर २०१४ पासून एरिया कमिटी मेंबर म्हणून ती कार्यरत होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीArrestअटकWomenमहिला