शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीदार मूळ पत्त्यावर सापडेना! गोव्याच्या मंत्र्यांविरोधातील वीज घोटाळा प्रकरणाचा खटला रेंगाळला

By सूरज.नाईकपवार | Updated: November 22, 2023 16:56 IST

मंत्री माविन गुदीन्हो यांच्याविरोधातील खटल्याची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव: गोव्याचे वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या विरोधातील कथित वीज घोटाळा प्रकरणातील खटल्यातील साक्षिदार त्यांच्या मूळ पत्त्यावर सापडत नसल्याने हा खटला रेंगाळला आहे. आज बुधवारी खास न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात सुनावणीस आला खरा मात्र आठ साक्षिदारांपैकी सर्वांचे समन्स परत आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता या खटल्याची पुढील सुनावणी या शुक्रवारी २४ नोव्हेंबरला होणार आहे.

वीज घोटाळाप्रकरणात मंत्री माविन गुदिन्हो हे प्रमुख संशयित आहेत. तब्बल २४ वर्षांनी या घोटाळा प्रकरणात न्यायालयात खटला चालू झाला आहे. गुदिन्हो यांच्यासह वीज खात्याचे तत्कालीन मुख्य अभियंते टी. नागराजन, कृष्ण कुमार, आर. के. राधाकृष्णन, मेसर्स मार्मगोवा स्टील लि. व मेसर्स ग्लास फायबर डिव्हिझन बिनानी झिंक हे अन्य संशयित आहेत.त्यातील एकाचे निधन झाले आहे.

आज बुधवारी ज्या आठ साक्षिदारांचे समन्स परत आले आहेत,त्यातील चार साक्षिदारांचा पत्ता लेखा संचनालयाकडून मिळविण्यात आला असून, त्यांना पुन्हा एकदा समन्स बजाविले आहे, मंत्री गुदीन्हो यांना या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी कायमस्वरुपी गैरहजर राहण्यास न्यायालयाने यापुर्वीच अनुमती दिली आहे, काल सुनावणीच्या वेळी दोन व तीन क्रमांकांचे संशयित अनुपस्थित होते. सरकारी वकील डी. कोरगावकर तसेच संशयितांचे वकील न्यायालयात हजर होते, आरोपपत्रानुसार ११ मे १९९८ रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी सादर केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण समोर आले होते. तब्बल २४ वर्षांनी ही न्यायालयीन सुनावणी सुरू झाली आहे. उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या कंपन्यांना वीजबिलात २५ टक्के सवलत देण्याची मागे घेतलेली अधिसूचना पुन्हा नव्याने जारी करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली नाही आणि बेकायदेशीररीत्या करोडो रुपयांची सवलत बड्या कंपन्यांना दिल्याचा आरोप माविन यांच्यावर ठेवण्यात आला आणि १९९८मध्ये गुन्हा अन्वेषण विभागाने याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.

टॅग्स :goaगोवाministerमंत्री