शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दागदागिने लुटून नवरी झाली पसार, एजंटला मालाड पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 10:30 IST

पसार झालेल्या वधूचे नाव आशा गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लग्नानंतर नवऱ्याच्या घरचे दागदागिने लुटून वधू पसार झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी लग्न लावण्यासाठी पैसे घेणाऱ्या एजंटला अटक केली आहे तर पसार झालेल्या वधूचा शोध पोलिस घेत आहेत.पसार झालेल्या वधूचे नाव आशा गायकवाड (३०) असे असून तिचे पती म्हणजेच तक्रारदार ऋषभ मेहता (२८) हे आहेत. मेहता हे दमण निवासी असून,  त्यांचे लग्न जुळत नव्हते त्यामुळे त्यांनी एका एजंटच्या मदतीने नवरी शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आशा हिच्याशी त्यांची भेट झाली आणि मेहतांचे तिच्याशी लग्न २९ मार्च २०२२ रोजी धूमधडाक्यात झाले होते. दरम्यान, १ एप्रिल रोजी गायकवाड ही मेहता यांच्या घरातील दीड लाखांची रोकड आणि ४ तोळे सोने घेऊन पसार झाली. ही बाब मेहता यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याप्रकरणी मालाड पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार कमलेश कदम याला अटक करण्यात आली. त्याने लग्न लावण्यासाठी १५ हजार रुपये कमिशन घेतले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर लेंगरे, हवालदार गुजर, शिपाई गावडे, कोली, बोधले यांनी मिळून आरोपी नवरी व एजंटचा शोध सुरू केला. त्यानंतर एजंट कमलेशला मालाडमधून अटक करण्यात आली.

टॅग्स :Arrestअटक