शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईटकॉलर चोर.. कारने आले आणि ट्रॉलीतून सूपरबाजारातील किराणा चोरला!

By योगेश पांडे | Updated: October 25, 2023 18:03 IST

सूपर बाजारातून ९३ हजारांचा किराणामाल चोरल्याची माहिती

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पांढरपेशे असल्याचा आव आणत एका कुटुंबातील सदस्यांनी चक्क रामदासपेठेतील एका सूपर बाजारातून ९३ हजारांचा किराणामाल चोरला. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी दोन कारने आले होते व तीन वेळा सूपरबाजारात जाऊन प्रत्येक वेळी ट्रॉलीतून माल बाहेर नेला. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

धापेवाडा येथील वॉर्ड क्रमांक चार येथील रहिवासी राजेश वसंतराव डोंगरे (४१), रजनी राजेश डोंगरे (४०), शुभम विठ्ठलराव आमले (२६), विकास वसंतराव डोंगरे (३२), राही विकास डोंगरे (३०) अशी आरोपींची नावे आहेत. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ते रामदासपेठेतील लॅंडमार्क बिल्डींगमधील रिलायन्स स्मार्ट बाजारात गेले. त्यांनी काही सामान घेतले व ट्रॉलीतून सामान घेऊन बाहेर गेले. काही वेळाने ते परत आले व परत थोडे सामान घेऊन बिल भरून ट्रॉली घेऊन बाहेर गेले. असा प्रकार त्यांनी तीन वेळा केला. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी ट्रॉली तपासली असता त्यात बिलात नमूद केल्याव्यतिरिक्त आणखी सामान आढळून आले.

सीसीटीव्हीतून तपासणी केली असता त्यांनी अशा प्रकारे भरपूर सामान चोरल्याची बाब समोर आली. कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारणा केली असता चोरलेले सामान पार्किंगमध्ये ठेवलेल्या कारमध्ये असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांनी तो माल तपासला असता त्याची किंमत ९३ हजार ७५० रुपये इतकी होती. हे आरोपी दोन कारमधून आले होते व चोरलेले सामान कारमध्ये ठेवून ते निघण्याच्य प्रयत्नात होते. स्मार्ट बाजाराचे असिस्टंट स्टोअर मॅनेजर सचिन तडस यांच्या तक्रारीवरून पाचही आरोपींविरोधात सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून याअगोदरदेखील त्यांनी अशा प्रकारे चोरी केली आहे का याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Robberyचोरी