शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मनोवैज्ञानिक तपासणी करणार म्हणजे काय? मनोज सानेची जे.जे. रुग्णालयात केली जाणार

By संतोष आंधळे | Updated: June 18, 2023 09:33 IST

मीरा रोड येथे मनोज साने याने त्याची साथीदार सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले.

बई : आपल्या साथीदाराची क्रूर हत्या करणाऱ्या मनोज साने (५६) याची पोलिस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी त्याची  मनोवैज्ञानिक चाचणी करणार असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. यासाठी त्याची सोमवारी, १९ जून रोजी जे. जे. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात सविस्तर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. 

मीरा रोड येथे मनोज साने याने त्याची साथीदार सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. एवढे क्रौर्य मनोज साने याच्यात आले कुठून, त्याची मानसिक स्थिती त्यावेळी काय असेल, याचा अंदाज घेण्यासाठी मनोज सानेची मनोवैज्ञानिक चाचणी केली जाणार आहे. अशा पद्धतीच्या चाचणीत मानसोपचार तज्ज्ञ आणि मनोशास्त्रज्ञ दोन्ही मिळून आरोपीच्या मनोवैज्ञानिक तपासणीअंतर्गत चाचण्या करतात. त्यात संबंधिताचे व्यक्तिमत्त्व मूल्यांकन, बौद्धिक क्षमता, विचार करण्याची प्रक्रिया याची तपासणी तर केली जातेच, शिवाय त्याशिवाय त्या व्यक्तीला काही वेळेसाठी वॉर्डात दाखल करून देखरेखीखाली ठेवण्यात येते. तसेच त्याच्या मानसिक स्थितीचे सखोल निरीक्षण केले जाते. यासाठी तज्ज्ञ अनेकदा अशा व्यक्तीशी संवाद साधून सगळी माहिती विचारत असतात.

अशा प्रकारच्या चाचणीत संबंधित व्यक्तीचे बौद्धिक, मानसिक मूल्यांकन केले जाते. तसेच अशा प्रकरणात रिसर्च इंकब्लॉट टेस्ट केली जाते, याला मानसशास्त्रज्ञ प्रोजेक्टिव्ह टेस्ट म्हणतात. यात जेव्हा एखाद्या व्यक्तीला अस्पष्ट, अर्थहीन प्रतिमा (म्हणजे शाईचा डाग) दाखवली जाते तेव्हा त्याचे मन त्या प्रतिमेचा अर्थ लावण्यासाठी कठोर परिश्रम करते. ती व्यक्ती अस्पष्ट प्रतिमेला आपल्या मनातील संदर्भानुसार अर्थ देते. त्या व्यक्तीची आकलनशक्ती, व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन आणि विशिष्ट मानसिक स्थितींचे निदान विशेषत: मनोविकृतीसाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते. - डॉ. शुभांगी पारकर, माजी विभागप्रमुख, केईएम रुग्णालय

टॅग्स :Mumbaiमुंबई