शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बदला म्हणून वृद्ध महिलेला विवस्त्र करून Video बनवला; औरंगाबादमधील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 05:55 IST

नातीला पळवून नेल्याचा ठेवला आराेप, विवस्त्र करून चित्रीकरण करीत वृद्धेला मारहाण 

गंगापूर (जि. औरंगाबाद) : आमच्या नातीला तुझ्या नातवाने पळवून नेले, असा आरोप करीत गंगापूर येथील अंतापूर शिवारात राहणाऱ्या वृद्ध महिलेला तालुक्यातील ओझर येथील तिघांनी घरी नेऊन विवस्त्र करीत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे. याप्रकरणी पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.    

फिर्यादी महिलेच्या नातवावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने तो सध्या फरार आहे. गंगापूर तालुक्यातील ओझर येथे राहणारे आरोपी विवेक उर्फ चावल्या पिंपळे, भावड्या पिंपळे व नीतूबाई पिंपळे या सर्वांनी शनिवारी  दुपारी वृद्ध महिलेच्या घरी जाऊन तुझ्या नातवाने आमच्या मुलीला पळवून नेले, असा आरोप केला व नातवाला शोधायला जायचे आहे, असे सांगून महिलेला गाडीत बसवले. त्यानंतर ओझर या ठिकाणी घरी नेऊन विवस्त्र करून मारहाण केली व याचा व्हिडीओ तयार करून व्हायरल केला. तसेच तिला दिवसभर डांबून ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली.  

घाबरलेल्या पीडितेने नातेवाइकांना सोबत घेऊन गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरोधात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी भावड्या पिंपळे, नीतूबाई पिंपळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य एक आरोपी फरार आहे.  

बदला म्हणून बनविला व्हिडीओ    फिर्यादी महिलेच्या नातवाने आरोपींच्या घरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या नातवाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ फिर्यादी महिलेच्या नातवाने बनविला, असा आरोप सध्या गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी केला होता. त्याचा बदला म्हणून फिर्यादी महिलेला डांबून तिला विवस्त्र करून मारहाण करतानाचा व्हिडीओ आरोपींनी बनविला असल्याचे म्हटले जात आहे.