शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आधी मुलीवर बलात्कार, मग निर्घृण हत्या; हाडं मोडून प्लास्टिकच्या पिशवीत टाकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:00 IST

पोलिसांचा वेगवान तपास, न्यायालयानं दिला निकाल; मृत मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केलं समाधान

उत्तर प्रदेश: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. स्त्रीसोबत झालेला असा अपराध कोणत्याही धर्म किंवा संस्कृतीला मान्य नाही, असं या खटल्याचा निकाल देताना विशेष न्यायाधीश डॉ. पल्लवी अग्रवाल यांनी म्हटलं. आरोपी अशोक कुमारला फाशीसोबतच १.४० लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये ४ ऑगस्टला अंगावर काटा आणणारी घटना घडली. पोलिसांनी त्याच रात्री आरोपीला अटक केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीची रवानगी कोठडीत केली. १८ सप्टेंबर २०२० रोजी पोलिसांनी न्यायालया आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयानं अशोक कुमारला फाशीची शिक्षा सुनावली.

हाडं मोडून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरलाघटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी आरोपीनं केलेलं कृत्य पाहून हादरले होते. अशोकनं लहान मुलीवर बलात्कार करून त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. त्यानं हाडं मोडून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकला आणि मग ती पिशवी फेकून दिली. घटनास्थळी मिळालेली प्लास्टिकची पिशवी, शवविच्छेदन अहवाल, मृत मुलीच्या बहिणीची साक्ष, मृत मुलीचा स्लाईड अहवाल या सर्व बाबी खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या.

लेकीला न्याय मिळाला; वडिलांनी व्यक्त केली भावना१३ महिन्यांनंतर लेकीला न्याय मिळाल्याची भावना मृत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली. आता आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलिसांची कारवाई, त्यानंतर न्यायालयानं दिलेला निकाल यामुळे पोलीस, न्याय व्यवस्थेवरील आमचा विश्वास आणखी वाढला असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.