शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चिटिंग कंपनीचे आणखी दोन आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 05:01 IST

५० कोटींच्या फसवणुकीचा अंदाज;  गुरनुले फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाने गुंतवणूक करण्यास बाध्य करणारा मुख्य आरोपी विजय रामदास गुरुनुले (वय ३९) अद्याप फरारच आहे. मात्र, गुरनुलेच्या चिटिंग कंपनीत सेकंड बॉस म्हणून मिरवणारा अविनाश महादुले आणि ऑफिस इन्चार्ज श्रीकांत निखुले या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे.  ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली चिटिंग कंपनी सुरू करून आरोपी गुरुनुले आणि त्याच्या साथीदारांनी शेकडो जणांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र मंदीचे वातावरण असताना गुरुनुलेची चिटिंग कंपनी चांगलीच तेजीत आली होती. अल्पावधीत भरभक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवून गुरनुले आणि त्याचे साथीदार गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढत होते. ज्यांनी लाखो रुपये गुंतवले त्यांना सुरुवातीला काही परतावा दिला जायचा. त्यामुळे ही मंडळीही ‘होयबा’ची भूमिका वठवित होती. त्यामुळे गुरनुलेच्या चिटिंग कंपनीत ग्राहकांची संख्या वाढतच होती. शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्यानंतर तो जुन्या ग्राहकांना टाळू लागल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो प्रतापनगर पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आरोपी विजय गुरुनुलेचे साथीदार जीवन दंडारे, रमेश बिसेन तसेच अतुल मेश्रामला अटक केली. ते सध्या पोलीस कस्टडीत आहेत. तर, त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी सकाळी आरोपी अविनाश महादुले आणि श्रीकांत निखुले यांना अटक केली. तपासावर वरिष्ठांची सूक्ष्म नजरया प्रकरणाच्या तपासावर परिमंडळ एकचे उपायुक्त नुरूल हसन यांची सूक्ष्म नजर आहे. त्यांनी आज महादुले आणि निखुलेची चौकशी केली. त्यानंतर एका फाऊंडर मेंबरसह दोघांना सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात बोलविले. त्यांची चौकशी सुरू होती. रात्रीतून आणखी काही आरोपींना अटक केली जाण्याची शक्यता उपायुक्त नुरुल हसन यांनी वर्तविली आहे. गुरनुलेलाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस सांगत आहेत. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी किमान ५० कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Arrestअटकfraudधोकेबाजी