शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 05:47 IST

रमजान महिना असल्याने तक्रारदार मुनाफ शेख याने मुंब्य्रातील अमृतनगर बसस्टॉपजवळील फुटपाथवर लेडिज चप्पल विकण्याचा धंदा लावला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रस्त्यावर दुकान लावण्यावरून मुंब्य्रातील अम्माद उर्फ अम्मू शेख (२१) याची सुरा भोसकून केलेल्या हत्येप्रकरणी मुंब्य्रातील अमीर सलीम शेख आणि कामरान अलीम शेख या दोघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.वाय. जाधव यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला असून, त्यापैकी ९० हजार रुपये हे मृताच्या पत्नीस देण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. या खटल्याचा एक साक्षीदार हा साक्ष देण्यासाठी दुबई येथून आला होता.

रमजान महिना असल्याने तक्रारदार मुनाफ शेख याने मुंब्य्रातील अमृतनगर बसस्टॉपजवळील फुटपाथवर लेडिज चप्पल विकण्याचा धंदा लावला होता. दरम्यान, या प्रकरणातील एक अल्पवयीन आरोपी त्या ठिकाणी आला होता. त्यावेळी अम्मू शेख आणि इम्रान नेपाळी हे दोघेही तिथेच धंदा करत होते. अल्पवयीन आरोपीने मुझे इस जगह पर धंदा लगाने का है, असे म्हणून अम्मूशी वाद घातला.त्यामुळे अम्मूने त्याला दोघे मिळून अर्ध्याअर्ध्या जागेत धंदा लावा, असे सांगितले. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी अल्पवयीन आरोपी तेथे आला आणि मुझे धंदा लगाने के लिए पुरी जगह चाहिए, असे म्हणून रागाने निघून गेला. त्याच रागातून अल्पवयीन आरोपी अमीर शेख, कामरान शेख आणि तारीक अशा चौघांनी अम्मूची २० जुलै २०१३ रोजी सुºयाने भोसकून हत्या केली.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.आर. नगरकर यांनी अल्पवयीन आरोपीसह जन्मठेप सुनावलेल्या दोघांना पकडले होते. त्यातील अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात केली गेली. उर्वरित दोघांविरोधात ठाणे न्यायालयात सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश जाधव यांच्या न्यायालयासमोर सरकारी वकील संजय मोरे यांनी सात साक्षीदार तपासले.

युक्तिवाद व पुरावे ग्राह्यमानून न्यायालयाने दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी सहा महिने कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंडातील ९० हजार मृताच्या पत्नीला आणि १० हजार रुपये सरकारजमा करण्याबाबत म्हटले आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी तारीक हा घटनेच्या दिवसापासून फरार आहे.