शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लंडनहून परतलेल्या डॉक्टरला अडीच कोटींना विकला 'अल्लाऊद्दिनचा दिवा' 

By कुणाल गवाणकर | Updated: October 29, 2020 11:47 IST

दोन आरोपींना पोलिसांकडून अटक; एका महिलेचा शोध सुरू

मेरठ: तुमच्या सगळ्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील, अशी बतावणी करत दोन जणांनी लंडनहून परतलेल्या एका डॉक्टरला 'अल्लाऊद्दिनचा दिवा' विकल्याची घटना घडली आहे. त्यासाठी दोघांनी डॉक्टरकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळले. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.अल्लाऊद्दिनचा दिवा म्हणून साधा दिवा विकून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच लंडनहून परतलेल्या डॉ. लईक खान यांनी खैरनगरमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणं गाठलं. यानंतर पोलिसांनी तथाकथित अल्लाऊद्दिनचा दिवा जप्त करत दोन आरोपींना अटक केली. २०१८ मध्ये आपण समीना नावाच्या एका महिलेच्या संपर्कात आल्याची माहिती खान यांनी पोलिसांना दिली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ड्रेसिंग करण्यासाठी ते अनेकदा तिच्या घरी जायचे.'समीनाच्या घरी मला इस्लामुद्दिन नावाचा तांत्रिक भेटला. आपल्याकडे बऱ्याच शक्ती आहेत. त्यातून मी तुला कोट्यधीश करेन, असं आश्वासन इस्लामुद्दिननं मला दिलं. त्यानंतर तांत्रिकानं मला अल्लाऊदिनचा दिवा देण्याचं वचन दिलं. त्या दिव्यातून जिन बाहेर पडत असल्याचंही त्यांनी मला दाखवलं. मी दिवा घरी नेतो असं त्यांना अनेकदा म्हटलं. पण मी दिव्याला हात लावल्यावर आक्रीत घडेल, असं ते दोघे म्हणायचे,' असं डॉ. खान यांनी पोलिसांना सांगितलं.अल्लाऊदिनच्या दिव्यातून बाहेर पडणारा जिन म्हणजे इस्लामुद्दीन असल्याचं एके दिवशी डॉ. खान यांच्या लक्षात आलं. अल्लाऊदिनच्या दिव्याच्या बदल्यात आरोपींनी माझ्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा दावा खान यांनी केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी पोलीस ठाणं गाठलं आणि मेरठच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर ब्रह्मपुरीचे सर्कल ऑफिसर अमित राय यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. इस्लामुद्दीन आण अनीस अशी दोघांची नावं आहेत. तर समीनाचा शोध सुरू आहे.