शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात पेपरफूट प्रकरण : दोन आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:15 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या पेपरफूटप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अद्याप पसार आहे.

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या पेपरफूटप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अद्याप पसार आहे. अटकेतील आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पेपरफूट प्रकरणाचे दूरवर पसरलेले धागेदोरे उकलण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.आशिष श्रीराम राऊत (२८, रा. बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला), निखिल अशोक फाटे (२७, रा. पलास गल्ली, गाडगेनगर, अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयातील लिपिक ज्ञानेश्वर प्रभू बोरे हा अद्यापही पसार असल्याचे प्राचार्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी पेपरफूट प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष राऊत यास बोर्डी रस्त्यावरून मोठ्या शिताफीने १२ जून रोजी उशिरा रात्री अटक करण्यात आली. त्याच्या बयाणावरून अमरावतीच्या गाडगेनगर स्थित फाटे कोचिंग क्लासेसचा संचालक निखिल फाटे यास त्याच्या निवासस्थावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयापुढे सादर केले. पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आशिष राऊत हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोलकाता येथील लर्निंग स्पायरल या कंपनीकडे अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. लर्निंग स्पायरल कंपनीकडे विद्यापीठातून अभियांत्रिकी महाविद्यालयांचे आॅनलाइन पेपर पाठविण्याची जबाबदारी होती. २९ मे रोजी आशिष राऊत याने वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयातील ज्ञानेश्वर बोरे याच्या मोबाइलवर ४५ मिनिटे अगोदर पेपर पाठविला. बोरे याने तो पेपर डाऊनलोड करून व्हायरल केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. बोरे अज्ञात पोलिसांना गवसला नाही. या प्रकरणातील आरोपींची संख्या १५ ते २० राहील, असे तपास अधिकारी राजेंद्र लेवटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  एमपीएससी परीक्षेचे ‘अमरावती कनेक्शन’महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी फाटे कोचिंग क्लासेस अवघ्या काही वर्षांत अमरावती शहरात नावारूपास आले आहे. येथून अभियांत्रिकीसह एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या डोळे दीपवून टाकणारी आहे. त्यामुळे फाटे कोचिंग क्लासेसचे एमपीएससी परीक्षेशी ‘कनेक्शन’ जुळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्या दृष्टीनेही उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर तपास करीत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ