शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा

By मनीषा म्हात्रे | Updated: March 25, 2023 08:38 IST

पहिल्या मजल्यावर ब्रह्मभट्ट कुटुंबीय राहण्यास आहे. त्यातील सायन्स शाखेचा अभ्यास करत असलेल्या जेनिलचा (१८) मृत्यू झाला, तर आई स्नेहल (४६) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पत्नी घर सोडून जात असताना ‘तुम नहीं आई तो मैं, किसीको नहीं छोडूगा, सबको मार डालुंगा,’ अशी धमकी त्याने दिली होती. तेच खरे ठरल्याचे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जेनील ब्रह्मभट्ट हिची  लहान बहीण देवांशी हिने सांगितले. सुरुवातीला इमारत पडत असल्याने आरडाओरडा झाला, असे वाटल्याने आई आणि बहीण वरच्या मजल्यावर गेल्या. त्यानंतर मात्र त्या रक्ताने माखून परतल्याने आम्ही हादरून गेलाे.

पहिल्या मजल्यावर ब्रह्मभट्ट कुटुंबीय राहण्यास आहे. त्यातील सायन्स शाखेचा अभ्यास करत असलेल्या जेनिलचा (१८) मृत्यू झाला, तर आई स्नेहल (४६) यांची प्रकृती चिंताजनक आहे. जेनिल आई-वडील आणि दोन भावंडांसोबत राहायची. चार दिवसांपूर्वी लहान भाऊ जयदेव याचा वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तसेच त्यांच्या घरात सत्संगदेखील होत असे. यावेळीही तो पार पडला.त्यांची लहान मुलगी देवांशीच्या माहितीनुसार, आम्ही सगळे घरात बसलो होतो. अचानक किंकाळ्या कानावर पडल्या. इमारत पडतेय या भीतीने आई-बहिणीने वरच्या मजल्यावर धाव घेतली. थोड्या वेळाने त्यांचा आवाज ऐकून मी जाणार तोच आई-बहीण रक्तबंबाळ अवस्थेत खाली आली. त्या दारातच बसल्या. कशीबशी ओढणी गुंडाळून शेजारच्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. 

नागरिक स्टम्प घेऊन धावले...  हल्ल्यानंतर चेतन पहिल्या मजल्यावर येणार तोच तेथील काही जणांनी स्टम्प घेऊन त्याच्या दिशेने धाव घेतली.   तेव्हा पळून जात त्याने घरात स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी घर गाठल्यानंतरही तो बाहेर येत नव्हता.   वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी बऱ्याच वेळेच्या ड्रामानंतर त्याला दरवाजा तोडण्याची धमकी देताच त्याने दरवाजा उघडला. मग, त्याला ताब्यात घेत अटक केली.

मुलगा थोडक्यात वाचला...  दुसऱ्या मजल्यावर राहणारा १० वर्षांचा मुलगाही या घटनेनंतर तेथे आला.   त्यालाही चेतनने पकडले.   मात्र, तो जोरात रडू लागल्याने आणि नागरिकांनी आरडाओरड करताच त्याने मुलाला सोडले आणि मुलगा घरी पळाला.   माझा मुलगा थोडक्यात बचावला, असे त्याचे वडील जिग्नेश शहा यांनी सांगितले.

आम्ही फक्त पळत होतो...  दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही झोपलेलो.   अचानक किंकाळी आणि जोराचा आवाज होताच बाहेर बघितले, तर चेतन हा सपासप वार करीत होता.   घाबरून आम्ही घरातच धाव घेत कोंडून घेतले.   अजूनही ते आठवले, तर अंगाचा थरकाप होत असल्याचे जैन कुटुंबीयांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबई