शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी; 20,000 च्या खंडणीसाठी पाठवला QR कोड

By पंकज पाटील | Updated: March 27, 2023 16:32 IST

या प्रकाराने गोंधळात पडलेल्या परबतसिंग चुडावत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याबाबतची माहिती दिली

अंबरनाथ - अंबरनाथमधील एका ज्वेलर्स व्यापाऱ्याला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने चक्क २० हजारांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा फ्रॉड कॉल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे धमकवणाऱ्या आरोपीने संबंधित व्यक्तीला क्यूआर कोड पाठवून 20 हजार रुपये तात्काळ पाठवण्यास सांगितले होते.

अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरात परबतसिंग चुडावत यांचे देव भैरव ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे. चुडावत यांना २३ मार्च रोजी एक व्हॉट्सऍप कॉल आला, ज्यावर समोरच्या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून बोलत असल्याचे सांगत २० हजार रुपये खंडणी मागितली. तसेच २० हजार रुपये न दिल्यास मुलीचे अपहरण करू, त्यानंतर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. २० हजार रुपये पाठवण्यासाठी धमकी देणाऱ्याने चक्क क्यूआर कोड पाठवला. या प्रकाराने गोंधळात पडलेल्या परबतसिंग चुडावत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी क्यूआर कोडवरून समोरील व्यक्तीचा नंबर मिळवला असता तो दिल्लीचा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक तपास केला असता हा फ्रॉड कॉल असल्याचे समोर आले. यानंतर आता हा कॉल करणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी असलेला लॉरेन्स बिष्णोई त्याच्या नावाचा वापर करून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे