शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हवालाच्या पाऊण कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांच्या डल्ला; धुळ्यातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 13:12 IST

कुरिअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारातच बस आल्यानंतर देखील झोपेतच होता.

धुळे शहरातील चार ते पाच सराफी पिढीच्या व्यापाऱ्यांनी मुंबई येथून सोन्याचे दागिने नेहमीप्रमाणे खरेदी केलेत. मात्र हे दागिने परिवहन महामंडळाच्या बस मधूनच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

धुळे शहरातील चार ते पाच सराफी पिढीच्या व्यापाऱ्यांनी नेहमी प्रमाणे मुंबईतून सोन्याचे दागिने खरेदी केले हे दागिने नेहमीप्रमाणे कुरियर कंपनीच्या माध्यमातून धुळ्यात आणण्यासाठी कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. विष्णुसिंह शिखरवार वय 32 राहणार नगलादास जिल्हा आग्रा, हल्ली मुक्काम काळबादेवी मुंबई या तरुणाच्या जय बजरंग कुरिअर कंपनीने धुळ्या बरोबरच नाशिक, मालेगाव आणि नंदुरबार च्या व्यापाऱ्यांचे सोन्याचे दागिने देखील डिलिव्हरीसाठी घेतले होते.

14 जूनला कुरिअर कंपनीचा कर्मचारी सोन्याचे दागिने घेऊन डिलिव्हरी देण्यासाठी निघाला. त्याने सर्वप्रथम नाशिक येथील व्यापाऱ्यांचे सुमारे 50 लाखांचे सोन्याच्या दागिन्यांची पोहच केली. त्यानंतर नाशिक बायपास गाडीने तो धुळ्यातील व्यापाऱ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसला. या प्रवासादरम्यान चोरट्यांनी डाव साधत धुळे, मालेगाव, नंदुरबार येथील व्यापाऱ्यांचे सुमारे 64  लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केले.

कुरिअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारातच बस आल्यानंतर देखील झोपेतच होता. त्याला बसमधील प्रवाशांनी जागे केले यावेळी त्यांनी आपल्याकडील बॅगची तपासणी केली असता दागिन्यांची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने या घटनेची माहिती मुंबई येथील कुरियर कंपनीच्या मालकाला दिली. कुरियर कंपनीच्या मालकाने ज्या सराफी व्यापाऱ्यांचे दागिने चोरीला गेले त्यांच्याशी संपर्क साधला तर धुळ्यातील ज्या व्यापाऱ्यांचे दागिने चोरीला गेले होते त्यांनी देखील धुळे शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुरिअर कंपनीच्या मालकाने अज्ञात चोरट्याविरुद्ध 64 लाख 80 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिने चोरीची तक्रार शहर पोलिसात दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :DhuleधुळेRobberyचोरी