शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ करणाऱ्या आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 01:15 IST

तब्बल तीन गुन्हे दाखल । दिंंडोशी पोलिसांची टाळाटाळ

मुंबई : शेजारी राहणाºया महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न, मारहाण आणि शिवीगाळ करण्याबाबत तीन गुन्हे आणि तब्बल ३४ अदखलपात्र तक्रारी दाखल असतानाही दिंडोशी पोलीस आरोपींविरूद्ध कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत संबंधित पिडीत महिलेने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

मालाड (पुर्व) येथील कासमबाग परिसरात राहाणाºया मलेकर कुटुंबीय गेली पाच वर्षे आपण आपले घर त्यांना विकावे यासाठी आपला मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याची सेल्वी पाकिनाथन हिची तक्रार आहे. २ आॅक्टोबर २0१८ रोजी आरोपी रंजना मलेकर, संगीता मिरजोळकर आणि प्रियंका मिरजोळकर यांनी आपणास बेदम मारहाण करून आपल्या तसेच आपल्या मुलाच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सेल्वी पाकीनाथन हिने केल्याने तिघा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.१ मे २0१९ रोजी संगीता मिरजोळकर हिने श्वेता पाकीनाथन हिने आपण पोलिसात केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी तिच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याबाबत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १७ जूनला संगीता आणि प्रियंका मिरजोळकर यांनी श्वेता पाकीनाथनचा लहान मुलगा दुकानात जात असताना पाठलाग करून त्याला सळईने मारहाण केली. त्यात त्याचा हाताला फ्रॅक्चर झाले. त्याबाबतही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही आपणास इतके गुन्हे आणि तक्रारी दाखल असताना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी सेल्वी पाकीनाथन हिची मागणी आहे. याबाबत खासदार गोपाळ शेट्टी आणि खासदार हुसेन दलवाई यांनीही वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

२३ आॅगस्टला सेल्वी पाकीनादन पतीसह सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात दाद मागण्यासाठी गेली होती. तेथून आपल्या घरी परतल्यावर रवींद्र मलेकर याचा त्याच विभागातील मित्र प्रसाद नेमण याने आपल्याला बांबूने बेदम मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रार तिने दिंडोशी पोलीस ठाण्यात केली. आपल्या मित्राविरूद्ध तक्रार करीत असल्याच्या रागाने त्याने मारहाण केली. त्यानुसार आरोपी नेमणविरूद्ध मारहाण, धमकी देण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

संबंधित आरोपींविरूद्धचा एक गुन्हा सोडला तर अन्य सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.- सुनील शिंदे,पोलीस निरीक्षक, दिंडोशी पोलीस ठाणे