शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:19 IST

पाच मोटारसायकली जप्त: गुजरातच्या सीमेवरून नौपाडा पोलिसांनी केली अटक; हेल्मेट घालून बिनधास्तपणे करायचा चोरी

ठाणे : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी उभ्या मोटारसायकलची रेकी करून नंतर हेल्मेट परिधान करून तिची चोरी करणाºया शैलेश ऊर्फ सुजित शाह (२२, रा. चरई, ठाणे) या अट्टल चोरट्यास गुजरातच्या सीमेवरून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. त्याच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या.

ठाणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहन, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. याच अनुषंगाने ठाणे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शैलेश याला गुजरातमधील उमरगा भागातील सोलसुंबा गावातून २८ जून २०१९ रोजी ताब्यात घेतले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची पक्की खबर नौपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक कवळे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक प्रसाद निकुंभ, हरीश तावडे, गोविंद पाटील, भागवत थाविल आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने त्याला अटक केली. दुचाकीची चोरी केल्यानंतर हेल्मेट घालून तो पळून जायचा. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्यावर संशय येत नव्हता. नौपाड्यातील दोन, बदलापूर, उल्हासनगर आणि शिवाजीनगर या भागातून प्रत्येकी एक अशा पाच मोटारसायकल चोरीची कबुली त्याने दिली असून या पाचही दुचाकी त्याच्याकडून हस्तगत केल्या.नवी मुंबई पोलिसांनीही केली होती यापूर्वी अटकयापूर्वी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानेही त्याला अटक केली होती. त्यावेळीही पाच ते सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघड झाले होते. त्याच्याकडे असलेल्या पाच चोरीच्या मोटारसायकली तो अल्प किमतीमध्ये विक्री करण्याच्या तयारीत असतानाच नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले असून, त्याच्याकडून आणखीही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होतील.