शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून तरुणाचा जीव गेला; ताडी केंद्रातील भांडण जीवावर बेतलं

By नामदेव मोरे | Updated: October 28, 2022 17:02 IST

दिघा येथील घटना, गुंड सोनू पांडे विरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई - दिघा परिसरातील ताडी विक्री केंद्रात गुंडाने केलेल्या मारहाणीमध्ये राज उतेकर या २० वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून गुंड सोनू पांडे याला अटक करण्यात आली आहे.भोलानगर परिसरात राहणारे राज उतेकर, राजु सुर्यवंशी व कल्पेश पाटील हे तिघे मित्र बुधवारी रात्री कामावरून आल्यानंतर ईश्वरनगरमधील ताडी विक्री केंद्रात रात्री ९ च्या दरम्यान ताडी पित होते. त्याच वेळी परिसरात गुंडगिरी करणारा सोनु पांडे त्याच्या मित्रांसाेबत आला व ताडी केंद्र चालविणारांकडे पैसे मागू लागला. यानंतर तेथे बसून ताडी पिऊ लागला.

त्यावेळी शेजारच्या टेबलवरून बसलेल्या राज उतेकर मित्रांसोबत बोलत असताना सोनुने त्याला आवाज कमी करण्यास सांगितले व शिवीगाळ सुरु केली. माझ्यासमोर आवाज करणार का अशी धमकी देत मारहाण सुरु केली. छातीवर व पोटावर लाथा, बुक्यांनी मारहाण केल्यामुळे राज बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.

या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सोनु पांडे याला गुरुवारी सकाळी सापळा रचून अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.