शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांच्या मुलाचा जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 08:49 IST

विरारमधील घटना : हत्येचा पोलिसांचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : विरार पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी तीन वर्षांच्या आदिवासी मुलाचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला आहे. काही दिवसांपूर्वी त्या मृत मुलाच्या सावत्र पित्याने त्याला जमिनीत पुरले होते. त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पंचनाम्यासाठी तेथे पोहोचलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. निकेश वाघ असे मृताचे नाव असून, तो त्याची आई दीपिका, भावंडे, आजी-आजोबा आणि सावत्र वडील गणेश वाघ यांच्यासोबत राहत होता.

मृत मुलासह संपूर्ण कुटुंब जीवदानी मंदिराच्या पायऱ्यावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. या मुलाच्या मृत्यूनंतर विरार पूर्वेकडील मंदिराच्या पायथ्याशी त्यांच्या राहत्या घराशेजारी मृतदेह पुरला होता. सावत्र बाप गणेश हा मद्यधुंद अवस्थेत नेहमी पत्नी व घरातील सर्वांना बेदम मारहाण करायचा. वाघ याच्या मारहाणीनंतर मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तीन फूट खोल खड्डा खणून मृतदेह ब्लँकेट आणि चटईमध्ये गुंडाळून पुरला होता. एका मुलाचा मृतदेह दफन केला असून, दफन स्थळाजवळ मुलाची भावंडे रडत होती, तेव्हा ही घटना उघडकीस आली. विरार पोलिसांशी तत्काळ संपर्क साधला.

...तर मृतदेह जेजेमध्ये पाठविणारमृत अल्पवयीन मुलाला दफन करण्यात आले होते. आम्ही मृतदेह बाहेर काढला असून, विरारच्या रुग्णालयात शवागारात सुरक्षित ठेवले आहे. गरज पडल्यास आम्ही मृतदेह जेजे रुग्णालयात पाठवू, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

मुलगा आजारी असल्याचा दावा अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, सावत्र वडिलांना भाटपाडा या डोंगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुलगा आजारी होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.