शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

भक्तांचे कथेकडे तर ‘या’ महिलांचे मंगळसुत्रांकडे लक्ष; १० महिलांना अटक

By राजेश शेगोकार | Updated: May 8, 2023 11:49 IST

२ लाख २८ हजारांचे दागिने लंपास: नागपूर,वर्धेसह राजस्थान, MP तील १० महिला अटक

अकाेला - अकाेला पातुर राेडवरील म्हैसपूर येथे ५ ते ११ मे दरम्यान शिव महापुराण कथा सुरू आहे. प्रख्यात पंडीत प्रदीप मिश्रा हे कथावाचक असल्याने या कार्यकमात भक्तांची विशेषत: महिलांची गर्दी होत आहे. या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत तब्बल १० महिलांनी कथेत गुंग महिलांच्या दागीण्यांवर हात साफ केला. तब्बल  २ लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आल्यावर पाेलसांनी या प्रकरणात नागपुर,वर्धेसह राजस्थान, मध्यप्रदेशातील १० महिला अटक केली आहे.  

कथेच्या दरम्यान जेवणाची विश्रांती दिली जात आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा असतात. यावेळी महिला चोरटेसुद्धा गर्दीचा फायदा घेऊन भाविक महिलांचे दागिने लंपास करीत आहे. अश्विनी अमित जुनारे (२९) रा. शास्त्री नगर अकोला यांनी सोन्याचे १ लाख २० हजारांचे दागिने लंपास झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. तसेच अर्चना दिगांबर देशमुख रा. नांदुरा, जि. बुलडाणा यांनी १८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दाखल केली. मानसी अमित मुरारका रा. न्यु राधाकिसन प्लाॅट अकोला यांनीही पोलिसांत तक्रार दिली. त्यांची ९० हजारांची पोत व अन्य सोन्याचे दागिने लंपास झाल्याची फिर्याद दिली. तिघांचे एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १० महिलांना ताब्यात घेऊन अटक केली.

यांना केली अटक आशा हरीलाल धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), मुंज्जु देवी राजु धोबीरा (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), चंदा सोनु धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), अनिता सुरेश धोबी (रा रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), कमलेश सुरजलाल बावरीया (रा. रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), शशी रीकु बावरीया (रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), कश्मीरा हीरालाल बावरीया (रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), प्रीया संदीप उन्हाळे (रा सावंगी मेघे जि वर्धा), सुरया राप्रसाद लोंडे (रा सावंगी मेघे जि वर्धा), लता किशन सापते (रा. भीमनगर इदोर राज्य मध्यप्रदेश) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.