शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची सिनेस्टाईल कारवाई; गुराखी, शेतकऱ्याचा पेहराव घेऊन आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 23:49 IST

दीड वर्षांपासून देत होते गुंगारा

परिमल डोहणे

चंद्रपूर -  वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत वनगुन्हा नोंद असलेल्या व मागील दीड वर्षांपासून वनविभागाला गुंगाऱ्या देणाऱ्या आरोपीला सावली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुराखी, शेतकरी असा पेहराव घेऊन मुडझा व बामणी येथून बुधवारी सिनेस्टाईल अटक केली. राजेंद्रसिंग जरनेलसिंग बावरी (३०) रा. मुडझा ता. ब्रह्मपुरी, शत्रुघ्न वसंत महाडोळे (३२) रा. बल्लारपूर ता. ब्रह्मपुरी असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.

ही कारवाई सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात पाथरीचे क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पाटील, राजोलीचे क्षेत्र सहाय्यक सुरेंद्र सिंग वाकडोत, व्याहाडचे क्षेत्र सहाय्यक रवी सुर्यवंशी, वनरक्षक महादेव मुंडे, वनरक्षक खेमराज गोडशेलवार, वनरक्षक श्रीराम आदे, वनरक्षक एकनाथ खुडे, अतिन मानकर, घनश्याम बनसोड, किशोर काटपलीवार, नागेश बद्दमवार आदींनी केली. पुढील तपास विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करत आहेत.

अशी केली कारवाईराजेंद्रसिंग व शत्रुघ्न हे दोघेही १३ ऑगस्ट २०२३ रोजी रानटी डुक्कर व ससा शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी होते. ते तेव्हापासून वनविभागाला गुंगारा देत होते. त्याच्या अटकेसाठी सावली वनविभागाचे पथक पाळत ठेऊन होते. दरम्यान राजेंद्रसिंग मुडझा येथे तर शत्रुघ्न बामणी येथे येणार असल्याची टीप वनविभागाला मिळाली.

त्याआधारावर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात सापळा रचन्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांपैकी कुणी शेतकरी, कुणी गुराखी तर कुणी गावातील नागरिकांची वेशभुषा परिधान करुन मुडझा व बामणी येथे बस्थान मांडून होते. दरम्यान राजेंद्रसिंग जरनेलसिंग बावरी मुडझा येथे येताच त्याला अटक केली. व शत्रुघ्न वसंत महाडोळे बामणी येथे येताच अटक करण्यात आली.

पोलिसांतही होता गुन्हा शोधराजेंद्रसिंग बावरी व शत्रुघ्न महाडोळे या दोघांवर अवैध दारुविक्री यासह विविध प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल होते, अशी मागणी वनविभागाने दिली. दरम्यान वन्यप्राणी शिकार प्रकरणात मागील दीड वर्षांपासून ते वनविभागाला गुंगारा देत होते. मात्र बुधवारी वनविभागाने बेड्या ठोकल्या.