शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत टोळक्यांची दहशत, मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, मदतीला आलेल्या लोकांवरही हल्ला

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 11, 2023 18:40 IST

कोपर खैरणेत झोपडपट्टी टोळ्यांची दहशत 

नवी मुंबई : आठ ते दहा जणांनी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्यांवर हल्ला झाल्याची घटना कोपर खैरणेत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सर्वजण परिसरातील झोपड्पट्टीतले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सदर परिसरात या टोळ्यांची दहशत निर्माण झाली आहे. 

कॉर्प खैरणे सेक्टर १९ मधील तलावालगत हा प्रकार घडला आहे. सदर परिसरात सकाळ संध्याकाळ स्थानिक नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. दरम्यान तिथेच काही गुन्हेगारी तरुणांचा वावर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रात्रीच्या वेळी आडोशाच्या ठिकाणी या टोळ्यांकडून नशा करण्यासह लुटमारी केली जाते. अशाच प्रकारातून रविवारी रात्री अज्ञात टोळीने साहिल छारी (१७) याला धरून ठेवले होते. त्याला होत असलेली मारहाण पाहून परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेला तुषार सिंग त्याच्या मदतीला गेला. यामुळे ८ ते १० जणांच्या टोळीने तुषारवर देखील रॉड व लादीच्या तुकड्याने हल्ला केला.

हा प्रकार पाहताच तिथून जाणारे आविश सिंग, अनिकेत सिंग व राहुल सिंग हे त्यांच्या मदतीला आले आले. मात्र टोळीने त्यांच्यावर देखील हल्ला करून जखमी करून पुन्हा भेटल्यावर मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला. यामध्ये जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी घडलेल्या घटनेची पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार आठ ते दहा जणांच्या अज्ञात टोळीवर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करणारी टोळी परिसरातल्या झोपड्पट्टीतली असल्याचा स्थानिकांचा संशय आहे. यापूर्वी देखील अनेकदा परिसरात गुन्हेगारी कृत्ये झाले असल्याने या टोळीची दहशत पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचा मागणी नागरिक करत आहेत.