शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याचा संशय : महिलेचे हात बांधून स्मशानभूमीत फिरवत जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 06:20 IST

कुकरखाडीपाडा येथील मोकन्या खेमा वसावे यांची बहीण वज्याबाई बोख्या पाडवी या महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावातील महिलेला जादूटोणा करून मारून टाकल्याचा आरोप करीत एका महिलेचे हात बांधून तिला स्मशानभूमीतून फिरवत चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना डाबचा कुकरखाडीपाडा, (ता. अक्कलकुवा) येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुकरखाडीपाडा येथील मोकन्या खेमा वसावे यांची बहीण वज्याबाई बोख्या पाडवी या महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. वज्याबाई या महिलेला गावातीलच चमारीबाई होमा पाडवी (४०) या महिलेने जादूटोणा करून डाकीण बनून मारून टाकले असा समज मोकन्या वसावे व त्याच्या कुटुंबीयांनी करून घेतला. त्यामुळे मोकन्या याच्यासह हुवलाबाई मोकन्या वसावे, वंती खेमा वसावे, रायकीबाई दिवाल्या वसावे सर्व (रा. कुकरखाडीपाडा) यांनी चमारीबाई पाडवी यांना घरून ओढत आणून स्मशानात नेले. तेथे दोन्ही हात दोरीने बांधून स्मशानभूमीस फेरी मारायला लावली व शपथ घेण्यास भाग पाडले. चौघांनी तिला काठीने व दोरीने बेदम मारहाण केली. त्यांच्यापासून सुटका झाल्यानंतर चमारीबाई यांनी पोलीस ठाणे गाठले. तेथे आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार आहेत. 

१० किमी चालत जाऊन कथन केली आपबितीnकुकरखाडीपाडा  हे गाव अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम आणि जंगली भागात आहे. गावी जाण्यास रस्ता नसल्याने पायीच जावे लागते. पीडित महिलेची सुटका झाल्यानंतर ती घरी गेली. nतिने याबाबत घरच्या सदस्यांशी चर्चा केली. तोपर्यंत रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी कुकरखाडीपाडा येथून पायी १० किमी चालत पीडित महिला मोलगी पोलीस ठाण्यात दाखल झाली. nतिने पोलिसांसमोर आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलीस तपास करत आहेत.