शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी-सासूच्या खून प्रकरणातील संशयितास जामीन मंजूर, ५ जानेवारीला झालेली अटक

By पंकज शेट्ये | Updated: February 21, 2024 20:58 IST

अनुरागसिंग रजावत याला दक्षिण गोवा जिल्हा प्रधानसत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती मिळाली.

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: ३ महीने ३ दिवसापूर्वी गॅस सिलिंडरला गळती होऊन स्फोटात मृत पावलेल्या गर्भवती शिवानी रजावत (वय २६) आणि तिची आई जयदेवी चव्हाण यांच्या खून प्रकरणात वास्को पोलिसांनी ५ जानेवारीला अटक केलेला शिवानीचा पती अनुरागसिंग रजावत याला बुधवारी (दि.२१) न्यायालयाने जामीन मंजूर केली. अनुरागसिंग रजावत याला दक्षिण गोवा जिल्हा प्रधानसत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती मिळाली.

१८ नोव्हेंबरला सकाळी तो स्फोट झाला होता. नवेवाडे येथील जय संतोषी माता मंदिरामागील नील पार्वती इमारतीच्या पहील्या मजल्यावर शिवानी राजावत तिचे पती अनुरागसिंग आणि काही दिवसापूर्वी तेथे आलेली शिवानीची आई जयदेवी सोबत राहायची. गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर शुभमसिंग चव्हाण यांनी त्याची बहिण आणि आईच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांनी बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांचा षडयंत्र रचून त्यांची हत्या केल्याचा आरोप करून त्याबाबत लेखी तक्रार पोलीसांना दिली होती. शिवानी आणि जयदेवी यांची हत्या शिवानीचे पती अनुरागसिंग यांनी केल्याचा दाट संशय शुभमने व्यक्त केला होता. हुंड्याच्या मुद्यावरून आणि अन्य विषयावरून बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांची हत्या केल्याचा संशय शुभमसिंग यांनी व्यक्त केला होता. शिवानीचा मृत्यू विवाहाच्या सात वर्षाच्या आत झाल्याने मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी त्याप्रकरणात चौकशी करित होते तर जयदेवीच्या मृत्यू प्रकरणात वास्को पोलीस चौकशी करित होते. शिवानीच्या मृत्यू प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून नंतर त्याचा अहवाल पोलीसांना सादर केला. तसेच त्यांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे योग्य चौकशी करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्यानंतर पोलीसांनी चौकशी करून २३ डीसेंबरला शिवानीच्या मृत्यू प्रकरणात तिचा पती अनुरागसिंग रजावत विरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध भादस ३०४ बी कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.५ जानेवारीला उशिरा रात्री पोलीसांनी शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात अनुरागसिंग रजावत विरुद्ध भादस ३०२ हा खूनाचा गुन्हा नोंद करून अनुरागसिंग याला अटक केली होती. शिवानी आणि जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशीवेळी अनुरागसिंग रजावत योग्यरित्या सहकार्य करत नसल्याने त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक केल्याची माहीती तेव्हा पोलीस निरीक्षक कपील नायक कडून मिळाली होती. शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या खूनाच्या प्रकरणात अटक केलेला अनुरागसिंग रजावत हा भारतीय नौदलाचा कर्मचारी असल्याची माहीती मिळाली होती.

५ जानेवारीला पोलीसांनी अनुरागसिंग याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत घेऊन त्याच्याशी खून प्रकरणातील चौकशी पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयीत कोठडीत पाठवण्यात आले होते. बुधवारी दक्षिण गोवा जिल्हा प्रधानसत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इरशाद आगा यांनी अनुरागसिंग रजावत याला जामीन मंजूर केल्याची माहीती वास्को पोलीसांकडून मिळाली.

टॅग्स :goaगोवा