शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Case :  आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 21:45 IST

Sushant Singh Rajput Case : गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, मिरांडा, सावंत, परिहार आणि झैद विलत्रा व अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

ठळक मुद्दे त्या आरोपीकडे ड्रग मिळाले नसेल तरी तपास यंत्रणा त्यांचे काम करू शकते,' असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी तहकूब केली.  

मुंबई : सुशांत सिंग राजपूत याला ड्रग्स पुरवत असल्याचा आरोप करत एनसीबीने अटक केलेल्या सॅम्युअल मिरांडा,  दीपेश सावंत व अन्य एकाच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी तहकूब केली.मिरांडा, सावंत व ड्रग विकणारा अब्दुल बसित परिहार  या तिघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे या याचिकांवर सुनावणी होती. गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, मिरांडा, सावंत, परिहार आणि झैद विलत्रा व अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.एनसीबीने त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना म्हटले की, या सर्व आरोपींना त्यांचा ड्रग्स विकत घेण्यात व त्यासाठी पैसे उपलब्ध करण्यामध्ये त्यांची असलेली भूमिका महत्त्वाची आहे.काही आरोपींकडे ड्रग्स आढळले नाही. तर ज्या आरोपींकडून ड्रग्स जप्त करण्यात आले त्यांच्याकडे अत्यल्प प्रमाणात ड्रग्स होते. त्यामुळे या आरोपींना जामीन मिळू शकतो, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.अत्यल्प प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलेल्या आरोपीला जामीन मिळू शकतो की नाही, यावर सर्व पक्षांनी पुढील सुनावणीत आपापले मत मांडावे, असे  न्या. कोतवाल यांनी म्हटले. 'तुम्ही कदाचित विक्रेते असाल म्हणून तुमच्याकडे काहीही ड्रग नसेल. पण ड्रगची खरेदी- विक्रीची साखळी तोडणे आवश्यक आहे. हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आरोपीची चौकशी करण्यास मोकळी आहे. त्या आरोपीकडे ड्रग मिळाले नसेल तरी तपास यंत्रणा त्यांचे काम करू शकते,' असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी तहकूब केली.  

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थHigh Courtउच्च न्यायालय