शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आई ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; रबाळेतील घटना; अन्य कारणांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 07:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : रबाळेत राहणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपासून ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : रबाळेत राहणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपासून ती मानसिक तणावात होती. दरम्यान, ती शाळेत जात नसल्याने आई ओरडल्याचे देखील पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. यातूनच तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात असून, इतरही काही कारण आहे का? याचाही अधिक तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

रबाळे एमआयडीसीमधील संभाजी नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. आरती सोनार (११) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून, ती महापालिकेच्या शाळेत पाचवीत शिकत होती. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिची आई कामावरून घरी आली असता, हा प्रकार उघड झाला. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, आतमध्ये आरतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आई-वडील कामावर तर मोठी बहीण खेळाच्या सरावाला गेली असताना हा प्रकार घडला आहे. ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेत शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. 

दरम्यान, ती शाळेत जात नसल्याने आई तिला ओरडली होती. त्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. परंतु, ती काही दिवसांपासून तणावात होती, असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र, तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांना त्याबाबत पुष्टी झालेली नाही. शिवाय कोणाविरोधात तक्रार नसल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले. यामुळे तिने आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पालकांची चिंता वाढलीपाचवीतल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एकीकडे बालगुन्हेगारी वाढत असताना, काहीजण अमली पदार्थांच्या देखील आहारी जाऊ लागले आहेत. त्यातच बालवयात मुलांवर येणाऱ्या मानसिक दडपणाच्या कारणांवरून पालकांची चिंताही वाढली आहे.