शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आईचे लाखो रुपये नशेत उडवून आत्महत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 01:49 IST

आरेतील प्रकार : तरुणावर गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आईचे बँकेतील लाखो रुपये नशा करण्यात उडविणाऱ्या तरुणाने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तो फसल्याने जंगलात त्याला लुबाडून त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आल्याचा बनाव केला. मात्र ही बाब खोटी असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झाले आणि आरे पोलिसांनी त्याच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल केला.

सोहन पाल असे या तरुणाचे नाव असून सध्या त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाल खासगी कंपनीत काम करत असून त्याच्या वडिलांची पानाची टपरी आहे. त्याला नशेचे व्यसन होते. आईसोबत बँकेत त्याचे जॉइंट खाते असल्याने नशेसाठी त्याने त्यातील चार लाख रुपये हळूहळू काढून संपविले. आईला हे समजेल याची त्याला भीती होती. त्यामुळे अखेर त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि आरेच्या युनिट क्रमांक ७ मध्ये जाऊन स्वतःचा गळा चिरला. मात्र अडीच तास उलटूनही त्याचा मृत्यू न झाल्याने अखेर मित्राला कुणीतरी आपल्यावर वार केल्याचे सांगत बाेलावून घेतले. 

अनोळखी महिलेने हिप्नाेटाईज करीत मानेवर वार केला आणि पैसे घेऊन पळ काढला, असे त्याने पोलिसांना सांगितले.  पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, सीसीटीव्ही फूटेज पडताळले. मात्र त्यात असे काही घडल्याचा पुरावा सापडला नाही. अखेर पोलिसांनी पालकडे कसून चौकशी केली आणि तो बनाव असल्याची कबुली त्याने दिली. 

टॅग्स :MONEYपैसा