Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात शास्त्रज्ञ आणि बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामधील सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन याला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनीला सतत मानसिक त्रास आणि गैरवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ११ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर परिसरात हा प्रकार घडला. मयत ३० वर्षीय विद्यार्थिनी बॉटनी विषयात पीएचडी करत होती. ती बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेत संशोधन करत होती आणि आरोपी बिन्नियमिन हा तिचा गाईड होता.
'मी आत्महत्या करते', मित्राला फोन
आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहिलेल्या चिठ्ठीत धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२५ पासून बिन्नियमिन हा तिच्याशी अनैतिक वर्तन करत होता, तसेच मानसिक छळ करत होता, असे तिने नमूद केले आहे. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत स्पष्ट केले आहे. घटनेच्या दोन दिवस आधी आरोपीने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही, चूक झाली, अशी कबुली लिहून दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतरही विद्यार्थिनी मानसिक धक्क्यातून सावरू शकली नाही. आई-वडील गावी गेले असताना विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी आपल्या मित्राला फोन करून 'मी आत्महत्या करते' असे सांगितले. मित्राने तिला बोलण्यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तिच्या घरी पोहोचण्यापूर्वीच तिने गळफास घेतला होता.
मयत विद्यार्थिनीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी डॉ. ए. बिन्नियमिन याला अटक केली. न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Web Summary : A PhD student in Pimpri-Chinchwad tragically committed suicide, citing harassment by her guide, Dr. A. Binniamin. He's accused of mental distress and misconduct, leading to his arrest. The student left a note detailing the abuse, prompting police action and a court remand.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में एक पीएचडी छात्रा ने प्रोफेसर डॉ. ए. बिन्नियामिन द्वारा प्रताड़ित किए जाने पर आत्महत्या कर ली। आरोपी पर मानसिक उत्पीड़न और दुर्व्यवहार का आरोप है, जिसके कारण उसे गिरफ्तार किया गया है। छात्रा ने एक नोट छोड़ा जिसमें उसने दुर्व्यवहार का खुलासा किया था।