शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषाचे नाव धारण करून शेअर केली चाईल्ड पोर्नोग्राफी क्लिप; अकोट तालुक्यातील महिलेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 11:41 IST

Child pornography clips : इन्स्टाग्रामवर इंटरनेटचा वापर करून चाईल्ड पोर्नोग्राफी क्लिप सेंड करून अपराधास्पद कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देनीतीभ्रष्ट कृत्य हस्तांतरित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- विजय शिंदे

अकोट : चाईल्ड पोर्नोग्राफीवर प्रतिबंध असताना अकोट तालुक्यातील सावरा येथील एका महिलेने बालकांचे लैंगिक चित्रीकरण व इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा गुन्हा घडल्याचे राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणेने स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की, महाराष्ट्र सायबर मुंबई यांच्याकडून अकोला पोलीस अधीक्षकांना सीलबंद एचपी डिव्हिडीसह पत्र प्राप्त झाले. या पत्रात फेसबुक, इंस्ट्राग्राम यांच्या मार्फतीने बाल अश्लीलता संदर्भात इंटरनेटवर कोणकोणत्या भारतातील युजर्सने व्हिडिओ शेअर केले. त्याबाबत टिपलाइन पुराव्यासह (आय.पी. ॲड्रेस, युजर्स नेम, शेअर व्हिडिओ) माहिती पुरविली गेली होती. त्यामध्ये अकोला जिल्ह्याच्या लोकेशनवरून एकूण पाच टिपलाइन्स पोर्नोग्राफीसंदर्भात शेअर केल्याचे लक्षात आल्याने पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश दिले होते. या पत्रातील सदर टिपलाइन्सचे केलेल्या अधिक चौकशीत इन्स्टाग्रामवर विक्की अग्रवाल हे नाव धारण करणारे आणि चौकशीत मोबाईल धारणकर्ता अकोट तालुक्यातील सावरा येथील एक महिला असल्याचे समोर आले. या महिलेने बालकांचे लैंगिक चित्रीकरण फाइल इन्स्टाग्रामवर इंटरनेटचा वापर करून सेंड करून अपराधास्पद कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. या महिलेने तिच्या मालकीच्या मोबाईलचा वापर करून इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून एचपी डिव्हिडीमध्ये नमूद असलेले लहान मुलाचे/बालकांचे अश्लील/कामुक चित्रण हे इंटरनेट वापरून अँटोनिया सिल्वा यांच्यासोबत नीतीभ्रष्ट कृत्य हस्तांतरित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार सायबर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांच्या तक्रारीनुसार अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये सावरा रहिवासी एका महिला आरोपींविरुद्ध भांदवि कलम २९२, सहकलम कलम ६७ (ब) अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीचे लोण आता ग्रामीण भागात

चाईल्ड पोर्नोग्राफीचे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. पुरुषांसोबतच महिलांचाही यात सहभाग आढळून येत आहे. लहान मुलांवर अत्याचार करणारे आणि लहान मुलांशी संबंधित अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन असणारे लाखो जण सध्या ऑनलाईन पद्धतीने विकृतीकडे वळत आहेत. त्यामुळे मुलांसाठी इंटरनेट असुरक्षित बनले आहे. यावर कठोर कारवाई न झाल्यास, मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये तीव्र वाढ होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

पोर्न वेबसाईट पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ

देशात टाळेबंदी लागू झाल्यापासून चाईल्ड पॉर्न, सेक्सी चाईल्ड आणि टीन सेक्स व्हिडिओ यांसारखे शब्द इंटरनेटवर टाकून त्यातून वेबसाईट पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी धक्कादायक माहिती ऑनलाईन डाटा मॉनिटरिंग वेबसाईट्सच्या अहवालातून समोर आली आहे. पोर्नहब या जगातील सर्वात मोठ्या पोर्नोग्राफी वेबसाइटवरील आकडेवारीवरून टाळेबंदीपूर्वी चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे सरासरी प्रमाण आता तुलनेने २४ ते २६ मार्च दरम्यान ९५ टक्क्यांनी वाढले असल्याचे निरीक्षण भारतीय बाल संरक्षण निधीने (आयसीपीएफ) नोंदविले आहे.