शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या महिलेचा खून, सलगरेत पुरले, नात्यातील तरूण ताब्यात

By शीतल पाटील | Updated: May 16, 2023 22:24 IST

खूनाचे कारण अस्पष्ट

शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: माधवनगर बस थांब्याजवळून बेपत्ता झालेल्या महिलेचा सलगरे (ता. मिरज) येथील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यानजीक खून करून जमिनीत पुरल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. गौरी जिनपाल गोसावी (३५, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या नात्यातील निहाल गोसावी या तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले. खूनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहिल्यानगरमधील प्रकाशनगर येथे गौरी गोसावी कुटुंबासह राहण्यास आहे. त्यांच्या कुटुंबाचा भंगारचा व्यवसाय आहे. मृत गौरी गोसावी सोमवारी सकाळी माधवनगर बस थांब्याजवळ असल्याचे नातेवाईकांनी पाहिले होते. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. नातेवाईकांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठत त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.दरम्यान, सलगरे हद्दीतील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यानजीक गायरान जागेत खून झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार संजयनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय मोरे, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जमिनीत महिलेचा मृतदेह पुरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. महिलेवर धारदार हत्याराने वार करण्यात ाआले आहेत. हा खून त्यांच्या नात्यातील निहाल गोसावी याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रात्री उशीरा ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. कवठेमहांकाळ आणि संजयनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी तपास कामात व्यस्त होती. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत खूनाचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे सलगरे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Arrestअटक