शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यात राजू पाटील सहभागी असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 04:09 IST

अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरण : विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद

अलिबाग : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे खून खटल्यातील आरोपी राजू पाटीलचा या खुनात सहभागी असल्याचा दावा विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी गुरुवारी येथील जिल्हा न्यायाधीश-३ व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात सुरूअसलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला.

खुनाच्या दिवशी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरने राजू पाटीलला फोन करून बोलावले. तो मंत्रालयातून कुरुंदकरच्या भार्इंदरच्या घरी पोहोचला. अश्विनी यांचा खून करायचा असल्याचे पाटीलला माहीत होते. खुनानंतर रात्री दीडच्या सुमारास पाटील भार्इंदर येथून निघून आमदार निवासात येऊन झोपला. गुन्ह्याच्या संपूर्ण कालावधीत त्याची मोबाइल लोकेशन्स सबळ पुरावा म्हणून तपास यंत्रणेने न्यायालयात दाखल केली आहेत, असेही घरत यांनी सांगितले.

राजू पाटील याचे वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी राजू पाटीलबाबत पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याने त्यास दोषमुक्त करावे याकरिता न्यायालयासमोर युक्तिवाद केला. राजू पाटील याच्यावर दोषारोप ठेवण्याइतका पुरावा तपास यंत्रणेने सादर केलेला नाही. त्याचा या गुन्ह्यात सहभाग होता हे सिद्ध करण्यास पुरावा पुरेसा नाही. परिणामी, राजू पाटील यास दोषमुक्त करावे, असा युक्तिवाद अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयात केला. पण, राजू पाटीलची मोबाइल लोकेशन्स बघता खून करणे आणि खुनाचा कट या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता हे स्पष्ट करणारे पुरावे न्यायालयात दाखवले आहेत. त्यामुळे त्याचा खुनात आणि खुनाच्या कटात सहभाग नव्हता असे म्हणता येणार नाही, असे अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.

११ जूनला होणार पुढील सुनावणीमुख्य आरोपी अभय कुरुंदकरचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केला. यापूर्वी दाखल केलेला जामीन अर्ज कुरुंदकर याने मागे घेतला होता. तसेच कुंदन भंडारी व महेश फळणीकर या आरोपींचे वकील या सुनावणी वेळी आले नसल्याने त्या दोघांची बाजू गुरु वारी मांडण्यात आली नाही. संपूर्ण युक्तिवादाअंती अभय कुरुंदकर यांच्या जामीन अर्जावरील निर्णय व पुढील सुनावणी सत्र न्यायाधीशांनी मंगळवार, ११ जून रोजी ठेवली आहे.