शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

अमरावती जिल्हा कारागृहात राडा, येरवडा रिटर्न कैद्यांनी घातला धुडगुस

By प्रदीप भाकरे | Updated: January 22, 2023 23:06 IST

आलेल्या आठ न्यायाधिन कैद्यांनी केला राडा, दोन कैदी जखमी

अमरावती - येरवडा कारागृहातून अमरावती मध्यवर्ती कारागृहात आलेल्या आठ न्यायाधिन कैद्यांनी येथील दोन कैद्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. कारागृह कर्मचाऱ्यांना सौम्य बळाचा वापर करुन तो हैदोस थांबविला. मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही कैद्यांना कारागृहातील रुग्णालयात ठेवण्यत आले. ही घटना २१ जानेवारी रोजी ५ ते रात्री ११ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आठ कैद्यांविरुध्द २२ जानेवारी रोजी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.             

येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ऋषिकेश मोडक व अर्जुन घुगे या दोघांना अश्लील शिवीगाळ करुन येरवडा कारागृहातून आलेल्या आठ कैद्यांनी मारहाण केली आहे. ते मारहाण करत असताना कारागृहात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न दोन कर्मचाऱ्यांनी केला, मात्र त्यांनी ऐकले नाही व मारहाण सुरूच ठेवली. अखेर या कर्मचाऱ्यांनी शिटी वाजवून कारागृहातील ईतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना तत्काळ बोलवले. त्यावेळी अन्य कर्मचारी आल्यानंतर त्यांनी हा वाद सोडवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. या प्रकरणी कारागृहाचे सुभेदार एएसआय प्रल्हाद इंगळे यांनी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी येरवडा येेथून आलेल्या त्या आठ कैद्यांविरुध्द रविवारी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींमध्ये अजय घाडगे, अक्षय सोनसे, आकाश मिरे, आशिष डाकले, अर्जुन मसके, प्रज्योत पांडुरंग, अभिषेक खोंड व अमिर मुजावर यांचा समावेश आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीPrisonतुरुंग