शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचा अतिरेकी मुंबईत जाळ्यात; राज्य दहशतवादविरोधी पथकाची मालाडमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 07:03 IST

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब येथील रहिवासी असलेला चरतसिंग हा पोलीस आणि तपास यंत्रणांच्या अभिलेखावरील अतिरेकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कारागृहातून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर साथीदारांच्या मदतीने पंजाब इंटेलिजन्स कार्यालयावर राॅकेट ग्रेनेडने हल्ला करणाऱ्या एका कुख्यात अतिरेक्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून अटक केली आहे. चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग कारीसिंग उर्फ करज सिंग (३०) असे या अतिरेक्याचे नाव असून त्याच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब येथील रहिवासी असलेला चरतसिंग हा पोलीस आणि तपास यंत्रणांच्या अभिलेखावरील अतिरेकी आहे. मार्च महिन्यात तो पंजाबच्या कपूरथला कारागृहातून दोन महिन्याच्या पॅरोल रजेवर बाहेर आला होता. त्यानंतर ९ मे रोजी चरतसिंग याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पंजाबच्या मोहाली येथे असलेल्या इंटेलिजन्स कार्यालयावर राॅकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो पसार झाला. अखेर चरतसिंग मालाड परिसरात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. याच माहितीच्या आधारे एटीएसने सापळा रचून चरतसिंग याला अटक केली.चरतसिंग कॅनडास्थित अतिरेकी लकबीरसिंग लांडा याच्या संपर्कात असल्याची माहिती राज्य एटीएसने केलेल्या चाैकशीत समोर आली आहे.