शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावच्या 'दिलीप'ला भोवला नर्सरीतील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, कोर्टाने ठोठावला दंडासह सश्रम कारावास

By महेश सायखेडे | Updated: August 12, 2022 17:41 IST

Crime News: नर्सरीचे शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुलगाव येथील दिलीप काशीनाथ कोंटागळे (६१) यास दोषी ठरवून दंडासह पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

- महेश सायखेडे वर्धा : नर्सरीचे शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुलगाव येथील दिलीप काशीनाथ कोंटागळे (६१) यास दोषी ठरवून दंडासह पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही टी. सूर्यवंशी यांनी दिला.

दिलीप कोंटागळे याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १० नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास व चार हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पीडितेची आई रोजमजुरीच्या कामाला गेली असता आरोपीने पीडितेच्या घराजवळ येत अंगणात खेळत असलेल्या पीडितेला आपल्या ताब्यात घेत झोपडीत नेले. आरोपीहा पीडितेवर अत्याचाराच्या प्रयत्नात असतानाच रडत असलेल्या पीडितेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा आरोपीने त्या लोकांना शिवगाळ करीत घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेची आई घरी परतल्यावर संबंधित घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी त्यांना दिली. त्यानंतर पुलगांव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनीही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक एहफाज मैनुद्दीन सैय्यद यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षा घेऊन न्यायाधिशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.

पाच साक्षदारांची तपासली साक्षया प्रकरणी शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण पाच साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालय