शहरं

पाकिस्तानचा झेंडा जाळला; शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 9:28 PM

न्यायालयाने आता त्यांना जामिनावर मुक्त केले आहे. 

ठळक मुद्देनवी मुंबईतही शिवसेना पक्षाने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली होती.याप्रकरणी शहरप्रमुख विजय माने, समीर बागवान आणि गणपत शेलार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.

नवी मुंबई - नवी मुंबईतपाकिस्तानचा झेंडा जाळणाऱ्या शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना २०१७ ची आहे. नवी मुंबईत सध्या मनपा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तारखेला हजर राहत नव्हते म्हणून पोलिसांनी त्यांची म्हणून उचलबांगडी करत अटक केली. न्यायालयाने आता त्यांना जामिनावर मुक्त केले आहे. २०१७ मध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी अबरनाथ यात्रेकरुंवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक भाविक ठार झाले होते. त्यावेळी पाकिस्तानविरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली होती. नवी मुंबईतही शिवसेना पक्षाने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली होती. त्यावेळी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला होता.त्यावेळी याप्रकरणी शहरप्रमुख विजय माने, समीर बागवान आणि गणपत शेलार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होत असताना तिघेही उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यावर गुरुवारी सकाळी वाशी पोलिसांनी तिघांनाही त्यांच्या घरातून अटक केली. दुपारी न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आले आणि त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

टॅग्स :ArrestअटकPakistanपाकिस्तानPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई

संबंधित बातम्या

क्राइम पुन्हा हादरली मुंबई, डोंबिवलीत 30 जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

क्राइम भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग; गृहराज्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महिनाभराने एफआयआर दाखल

क्राइम वर्षभरापूर्वी २ मुलांचं निधन; नैराश्यातून वडिलांनी गळफास घेऊन संपवलं जीवन

क्राइम बलात्काराच्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्र 23 व्या स्थानी, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत दहावा

क्राइम ...तर भारत उडवू शकतो, चीनचे कोणतेही शहर! ठरेल अशी कामगिरी करणारा जगातला आठवा देश

क्राइम कडून आणखी

क्राइम डोंबिवलीतील एका १४ वर्षीय मुलीवर ३१ जणांचा सामुहिक अत्याचार

क्राइम Pune Crime: सासूच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जावयावर गुन्हा

क्राइम भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल

क्राइम जळगावात घरात घुसून गोळीबार

क्राइम मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक