शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या वादातून केलेली मालकाची हत्या; फरार आरोपीस १९ वर्षांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 07:18 IST

डोंबिवलीतील सुखनिवास लॉज येथे राहणारे रेगो यांचे त्यांची देखभाल करणारा राजाराम शेट्टी याच्याबरोबर पैशांवरून भांडण झाले होते.

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पैशांच्या वादातून सिप्रेम जोसेफ रेगो (५३, रा. डोंबिवली) या आपल्याच मालकाचा खून करून तब्बल १९ वर्षे फरार असलेल्या राजाराम राजीव शेट्टी (६५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला रामनगर (डोंबिवली) पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोंबिवलीतील सुखनिवास लॉज येथे राहणारे रेगो यांचे त्यांची देखभाल करणारा राजाराम शेट्टी याच्याबरोबर पैशांवरून भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्यामुळे राजाराम याने रेगो यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून त्यांचा खून करून ८ मे २००१ रोजी पलायन केले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी राजाराम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तो कर्नाटक राज्यातील कुद्र (जिल्हा-उडपी) येथील रहिवासी असल्यामुळे गावी, तसेच महाराष्ट्रातील नाशिकसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करीत होता. त्यामुळेच तो पोलिसांना मिळत नव्हता.

दरम्यान, तो ठाण्यातील विटावा ब्रिजजवळ येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक व पथकाने १९ नाेव्हेंबरला त्याला ताब्यात घेतले. या तपासासाठी मोहन भानुशाली यांचे विशेष सहकार्य मिळाले. राजाराम याच्याविरुद्ध सीआरपीसी २९९ नुसार दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आयुक्तांकडून दखलतब्बल १९ वर्षे पाठपुरावा करून आरोपीला कौशल्याने अटक केल्याने युनिट-१ च्या तपास पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक