शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारण्याचा एकाचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:28 IST

आमदारांच्या प्रतीकात्मक प्रेतास भडाग्नी देत असतांना घडली घटना, ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला 

ठळक मुद्देआरक्षण प्रश्नी मौन धारण करणाºया मराठा समाजाच्या आमदारांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्राजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनस्थळी दिला भडाग्नीयाचवेळी एका व्यक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न, वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. 

आॅनलाइन लोकमतधुळे : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात आवाज न उठविणाºया मराठा समाजाच्या १४७ आमदारांचा निषेध म्हणून त्यांची मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरात सकाळी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. सकाळी ११.३० वाजता चाळीसगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या प्रतीकात्मक अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  प्रतीकात्मक प्रेतास भडाग्नी देत असताना जितेंद्र जांभळे (४२) याने सर्वांची नजर चुकवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला आणि तेथून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. प्रतीकात्मक अंत्ययात्रा आग्रारोडमार्गे पाचकंदील चौक, शहर पोलीस चौकी, कराचीवाला खुंट चौक या मार्गे महापालिकेजवळ पोहचली. तेथे अंत्ययात्रेस प्रतीकात्मक विसावा देण्यात आला. तेथून अंत्ययात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी आणण्यात आली. या अंत्ययात्रेत मराठा समाजबांधवांसह राजकीय पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान अंत्ययात्रा आंदोलनस्थळी पोहचली. त्यानंतर प्रेतयात्रेला भडाग्नी देत असतानाच जितेंद्र जांभळे या व्यक्तीने सर्वांनी नजर चुकवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला. आणि तेथून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यास वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. प्रतीकात्मक अंत्ययात्रेस  पोलीस दलातर्फे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी