शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

कर्ज देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:43 IST

गुन्हा दाखल : शोधासाठी विशेष पथक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दोन कोटींचे कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्यांच्या नावाखाली एका फार्मास्युटिकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून, आरोपींच्या शोधासाठी एका विशेष पथकाची निर्मिती केली आहे.ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक-२ येथील वसंत विहार भागातील ५१ वर्षीय गृहस्थ हे वागळे इस्टेट येथील एका फार्मास्युटिकल कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. एका इंग्रजी सायं दैनिकात प्रसिद्ध झालेली ‘पारस फायनान्स’ गव्हर्नमेंट अ‍ॅप्रूव्हल मार्कशीट, अ‍ॅग्रीकल्चर, बिझनेस आणि पर्सनल लोन २४ तासांत मिळेल, अशी जाहिरात त्यांनी वाचली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाइलवर त्यांनी संपर्क साधला. हा फोन सुनील चव्हाण या व्यक्तीने घेतला. त्याच्याकडे कर्जाबाबतची चौकशी केली, तेव्हा त्याने आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. त्याने दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर त्यांनी कागदपत्रेही पाठवली. ती पडताळून तुम्हाला दोन कोटींचे कर्ज मंजूर होईल, असे त्यांना भासवले, पण काही शुल्क भरावे लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. वेगवेगळ्या शुल्कांच्या नावाखाली या उपाध्यक्षांकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर १४ लाखांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढची रक्कम भरली नाही. मात्र, कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी एका मोठ्या वित्तीय कंपनीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तिथेही त्यांच्याकडून ८७ लाख ५० हजारांची आॅनलाइन फसवणूक करण्यात आली. या दोन्ही कथित फायनान्स कंपन्यांनी मिळून जुलै ते आॅक्टोबर, २०१९ या कालावधीत त्यांची सुमारे एक कोटी एक लाख ६४ हजारांची फसवणूक केली. त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, चौकशी करून २१ सप्टेंबर, २०२० रोजी दोन वित्तीय कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.