शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम सेंटरमध्येच अधिकाऱ्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 03:42 IST

एअर इंडीयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाºयाची एटीएम सेंटरमध्येच फसवणूक झाल्याची घटना माहिममध्ये उघडकीस आली आहे.

मुंबई : एअर इंडीयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाºयाची एटीएम सेंटरमध्येच फसवणूक झाल्याची घटना माहिममध्ये उघडकीस आली आहे. यात ठगाने त्यांच्या खात्यातील ९३ हजार रुपयांवर हात साफ केला आहे. या प्रकरणी माहिम पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.माहिमच्या मच्छीमार वसाहतीत राहणारे अनिल जाधव यांची यात फसवणूक झाली आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जानेवारी रोजी ते जवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. याच दरम्यान त्यांनी २० हजार रुपये काढले आणि ते पैसे मोजत उभे असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या ठगाने व्यवहार पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. त्यांनी पुन्हा एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकून तपासणी केली.त्याच दरम्यान हातचलाखीने ठगाने त्यांच्या एटीएम कार्ड बदलले. १६ ते १८ जानेवारी दरम्यान केलेल्या ६ व्यवहारांत त्यांच्या खात्यातून तब्बल ९३ हजार २७८ रुपये काढले. याबाबतचा संदेश मोबाइलवर धडकताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी रविवारी माहिम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून माहिम पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :atmएटीएम